एल्गार न्यूज :-
Old Passbook Changed Life : कोणाचे नशीब कधी पलटेल काही सांगता येत नाही, असं म्हटलं जातं की काहींच्या नशीबात आयुष्यभर कष्ट लिहीलेले असतात तर काहींना मात्र नशीबाची साथ मिळते, पण कुणाचे नशीब कधी, कुठे आणि कसे पालटेल याची कोणालाच कल्पना नसते.
वडीलांच्या निधनानंतर जवळपास 10 वर्षानंतर मुलगा त्याच्या घराची साफसफाई करत होता, वडीलांच्या ज्या जुन्या वस्तू कपाटात होत्या त्या सहज तपासत होता, मुलाला या वस्तूमध्ये एक बँकेचे पासबुक दिसले, मुलाने सदरील पासबुक पाहीले असता हे पासबुक जवळपास 60 वर्षे जुने होते.
सदरील पासबुक मध्ये जेव्हा मुलाने रक्कम पाहीली तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्यामध्ये थोडीफार नव्हे तर कोट्यावधीची रक्कम होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार एक्किवल हिनोजोस याच्या वडीलांनी 1960 ते 1970 च्या दरम्यान घर खरेदी करण्यासाठी पैसे जमा केले होते.
Old Passbook Changed Life
पासबुक मधील नोंदी नुसार बँक खात्यात 8 कोटी 22 लाख रूपये जमा होते. दरम्यान वडीलांचं 10 वर्षांपूर्वी निधन झालं होते, आणि कुटुंबातील कोणालाच या रक्कमेची माहिती नव्हती, आता दुर्दैवाने ही बँक पण बंद झाली होती, परंतू यात एक दिलासा असा होता की, State Guaranteed असा उल्लेख होता.
म्हणजेच जर बँक पैसे देण्यास असमर्थ ठरली तर राज्य सरकार पैसे देईल, पण सध्याच्या सरकारने पैसे देण्यास नकार दिला, यानंतर एक्किवएल हिनोजोस यांनी राज्य सरकार विरोधात कोर्टात धाव घेतली.
एक्किवल यांनी कोर्टात असे सांगितले की, हा पैसा माझ्या वडीलांनी खूप मेहनतीने कमवला होता, हा पैसा आमच्या हक्काचा आहे. तेव्हा कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून निकाल एक्किवल यांच्याकडून दिला आणि राज्य सरकारला 10 कोटी रूपये देण्याचा आदेश दिला. तसेच यासह जमा झालेल्या व्याज आणि भत्यांसह भरपाई देण्यासही सांगितले. सदरील घटना ही चिले या देशातील आहे.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.