Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथील वरिष्‍ठ पत्रकार सुरेश दाड यांच्‍या पत्‍नी सौ.नीताताई दाड यांचे निधन !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

कुंभार पिंपळगांव :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील वरिष्‍ठ पत्रकार सुरेश रामचंद्र दाड यांच्‍या पत्‍नी सौ.नीताताई दाड यांचे दि.26 रोजी सकाळी 6.35 वा. निधन झाले. मृत्‍यू समयी त्‍यांचे वय 49 वर्षे होते.

त्‍यांच्‍या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, सासरे, दीर, जावा असा परिवार आहे. दुपारी 3 च्‍या सुमारास त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. यावेळी मोठ्या संख्‍येने नागरिक उपस्थित होते.

संघर्षमय जीवन !

स्‍व.निताताई सुरेश दाड ह्या अत्‍यंत मनमिळावू व कुटुंबातील सर्वांना घेवून चालणाऱ्या होत्‍या, त्‍यांचे पती अर्थात सुरेश दाड यांचे लहाने तिन्‍ही बंधूंसाठी त्‍या आईप्रमाणेच होत्‍या. पत्रकार सुरेश दाड यांना संघर्षमय जीवनात त्‍यांनी कायम साथ दिली. कधीही कोणत्‍याही गोष्‍टीची अपेक्षा केली नाही, कायम कुटुंबासाठी त्‍या तत्‍पर राहील्‍या.

निताताई व सुरेश दाड यांच्‍या मोठ्या संघर्षमय प्रवासानंतर त्‍यांचा मुलगा डॉक्‍टर झाला होता, तसेच सूनही डॉक्‍टर मिळाली होती, शिवाय मुलगीही डॉक्‍टर झाली होती. आता चांगले दिवस पहायला मिळतील अशी आशा बाळगून असतांनाच अचानक मृत्‍यूने त्‍यांना कवटाळले. त्‍यांच्‍या निधनाने सर्वत्र हळहळ व्‍यक्‍त होत आहे.

पत्रकार सुरेश दाड व त्‍यांच्‍या परिवाराला या मोठ्या दुखातून सावरण्‍याची भगवंत शक्‍ती देवो हीच प्रार्थना… निताताई दाड यांना भावपूर्ण श्रध्‍दांजली…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!