Your Alt Text

सहकार भारतीच्‍या वतीने नवनाथ अर्बनला उत्‍कृष्‍ट नागरी पतसंस्‍था पुरस्‍कार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
पतसंस्‍थेच्‍या माध्‍यमातून ग्राहकांच्‍या विश्‍वासाला पात्र ठरवत आपल्‍या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व यशस्‍वी वाटचाल करणाऱ्या “नवनाथ अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.” या पतसंस्‍थेला सहकार भारतीच्‍या वतीने “उत्‍कृष्‍ट नागरी पतसंस्‍था पुरस्‍कार २०२५” देवून सन्‍मानीत करण्‍यात आले आहे.

नवनाथ अर्बनला सदरील पुरस्‍कार मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत प्रदान करण्‍यात आला. या कार्यक्रमात सदानंदजी वूइके (वि.ले स.सं.मुख्यालय पुणे), गणेशजी निमकर (स.तज्ञ पुणे), परमेश्वर वरखडे (जि.उ.स.सं.जालना), धनंजय चव्हाण (जि.वि.ले.स.सं.जालना) व सचिनजी वाणी (अध्यक्ष सहकार भारती जालना) या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दिनांक ११ रोजी.शोर्य लॉन्स, जालना येथे देण्‍यात आला. यावेळी नवनाथ अर्बन को-ऑप. क्रेटिड सो. लि. चे कर्मचारी उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हाभरातून संस्थेच्या कामाचे कौतुक होत आहे. हा पुरस्कार ग्राहकांनी व हितचिंतकांनी संस्थेबद्दल दाखवलेले प्रेम व विश्वास याचे फलित आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय कंटुले हे म्हणाले. सदरील पुरस्‍कारामुळे नवनाथ अर्बनचे अध्‍यक्ष व कर्मचारी यांना पुढील काळात अधिक जोमाने काम करण्‍यासाठी प्रोत्‍साहन मिळाले असून भविष्‍यातही पतसंस्‍था उत्‍तरोत्‍तर प्रगती करत राहील अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!