Your Alt Text

आनंदाची बातमी ! नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्‍ता या दिवशी येणार ! तारीख ठरली ! | Namo Shetkari Yojana Installment

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
Namo Shetkari Yojana Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून राज्‍य सरकारच्‍या ज्‍या नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेच्‍या पहिल्‍या हप्‍त्‍याची शेतकरी वाट पाहत होते त्‍याचा हप्‍ता आता शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यात जमा होणार आहे.

आपल्‍याला माहितच असेल की, केंद्र शासनाच्‍या पीएम किसान योजनेच्‍या धर्तीवरच राज्‍य सरकारने महाराष्‍ट्रातील शेतकऱ्यांसाठी Namo Shetkari Masanman Nidhi Yojana सुरू केली होती. योजनेच्‍या पहिल्‍या हप्‍त्‍यासाठी काही दिवसांपूर्वीच निधी मंजूरही करण्‍यात आला होता.

Namo Shetkari Yojana Installment

केंद्र सरकारच्‍या पीएम किसान योजनेत ज्‍या प्रमाणे शेतकऱ्यांना वर्षभरात 2 हजाराचे 3 हप्‍ते म्‍हणजेच एका वर्षात 6 हजार रूपये दिले जातात. त्‍याच प्रमाणे नमो शेतकरी योजनेतही शेतकऱ्यांना वर्षभरात 2 हजाराचे 3 हप्‍ते दिले जाणार आहेत. म्‍हणजेच एका वर्षात 6 हजार रूपये दिले जाणार आहेत.

पीएम किसान योजने प्रमाणेच राज्‍य सरकारने सुध्‍दा नमो शेतकरी योजना सुरू केल्‍यामुळे शेतकऱ्यांना डबल फायदा होणार आहे. म्‍हणजेच वर्षभरात केंद्राचे 6000 हजार आणि राज्‍याचे 6000 हजार असे एकूण 12 हजार रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्‍ता कधी मिळणार ?

राज्‍य सरकारच्‍या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्‍ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते पात्र शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यात जमा केला जाणार आहे. शिर्डी येथे गुरूवार दि. 26 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सदरील हप्‍ता वितरीत केला जाणार आहे. मात्र ज्‍या शेतकऱ्यांनी निकष पूर्ण केले नाहीत त्‍यांना हप्‍ता मिळणार नाही.

कोणत्‍या शेतकऱ्यांना हप्‍ता मिळणार नाही ? येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!