एल्गार न्यूज :-
Namo Shetkari Yojana 1st Installment : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीने शिंदे- फडणवीस- पवार सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अर्थातच या निर्णयाची घोषणा यापूर्वीच झाली होती, मात्र आता हप्त्याच्या रक्कमेस मंजूरी मिळाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारकडून PM Kisan Samman Nidhi या योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षभरात 2000 चे 3 हप्ते असे एकूण 6000 रूपये दिले जातात. सदरील पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात.
सदरील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना सुध्दा 2 हजार चे 3 हप्ते असे वर्षाला 6000 रूपये देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता, मात्र त्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आली नव्हती. परंतू सरकारने आता या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी रक्कम मंजूर केली आहे.
Namo Shetkari Yojana 1st Installment
दि.10 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत Namo Shetkari Mahasanman Nidhi योजने च्या पहिल्या हप्त्याला मंजूरी देण्यात आली असून शासनाने योजनेसाठी 1720 कोटीच्या निधीस मान्यता दिली आहे.
जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी या राज्य सरकारच्या योजनेचा सुध्दा लाभ मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला केंद्र सरकारचे 6000 व राज्य सरकारचे 6000 असे एकूण 12 हजार रूपये मिळणार आहेत.
Namo Shetkari Mahasanman Nidhi
राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी मंत्रिमंडळाने 1720 कोटी रूपये मंजूर केले असले तरी पैसे कधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीच तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील असे सांगण्यात येत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.