Your Alt Text

जालना ते मुंबई वंदे भारत एक्‍सप्रेस ट्रेन सुरू होणार ! मराठवाड्याला दिलासा ! | Mumbai Jalna Vande Bharat Express

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
Mumbai Jalna Vande Bharat Express : देशामध्‍ये वंदे भारत एक्‍सप्रेस ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहे, अनेक सुविधा असलेल्‍या या ट्रेनला लोकांची मोठी पसंती मिळत आहे. त्‍यामुळे देशातील‍ विविध मार्गावर या ट्रेनला सुरू करण्‍याच्‍या हालचाली सुर झाल्‍या आहेत.

मराठावाडा अनेक बाबतीत दुर्लक्षीत राहीलेला आहे, इतर विभागांच्‍या तुलनेत मराठवाड्यात ज्‍या प्रकारे विकास आणि योजना राबविणे आवश्‍यक होत्‍या त्‍या झाल्‍या नसल्‍याचे दिसून येते. मात्र आता ट्रेनच्‍या बाबतीत मराठवाड्यावरही काही अंशी का असेना लक्ष दिले जात असल्‍याचे दिसून येत आहे.

वंदे भारत ट्रेन मिळणार !

मुंबई ते जालना प्रवास करणाऱ्यांची संख्‍या मोठी आहे, त्‍यातच केंद्र सरकार देशातील विविध धार्मिक आणि पर्यटन स्‍थळांना रेल्‍वे मार्गाने जोडण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून मुंबई ते जालना वंदे भारत एक्‍सप्रेस ट्रेन सुरू करण्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहेत.

Mumbai Jalna Vande Bharat Express

जालना जिल्‍ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्‍थळे असल्‍यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणाहून जालना जिल्‍ह्यात अथवा मराठवाड्यात येणाऱ्यांची संख्‍या मोठी आहे. त्‍यामुळे आता जालना जिल्‍ह्यासाठी वंदे भारत एक्‍सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. सदरील ट्रेन सुरू झाल्‍यास जिल्‍ह्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

वंदे भारत एक्‍सप्रेस ही ट्रेन भारतीय बनावटीची असून या मध्‍ये अनेक सुविधा आहेत. सदरील ट्रेन हायस्‍पीड असल्‍यामुळे जालना ते मुंबई कमी वेळेत पोहोचणे शक्‍य होणार आहे. सदरील ट्रेन सुरू झाल्‍यास मराठवाड्याला पर्यटन, कृषि, शैक्षणिक व विकासाच्‍या दृष्‍टीने मोठा फायदा होणार आहे.

किती डब्‍यांची आहे ट्रेन ?

सदरील वंदे भारत एक्‍सप्रेस ही ट्रेन आधी 16 डब्‍यांची होती, मात्र आता डब्‍यांची संख्‍या कमी करून 8 वर आणण्‍यात आली आहे, म्‍हणजेच बहुतांश वंदे भारत एक्‍सप्रेस ट्रेन ह्या 8 डब्‍यांच्‍या असणार आहेत.

ट्रेन केव्‍हा सुरू होणार ?

सदरील ट्रेनच्‍या मार्गातील विद्युतीकरण, सिग्‍नल यंत्रणा, रेल्‍वे मार्गांचे मजबुतीकरण इत्‍यादी कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. अर्थातच या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे, शिवाय गाडीचे वेळापत्रक तयार करण्‍याचे कामही अंतिम टप्‍प्‍यात आहे. त्‍यामुळे येत्‍या काही दिवसात ही ट्रेन सुरू होणार असल्‍याचे सांगितले जात आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!