एल्गार न्यूज विशेष :-
MSRTC Commuters App : महामंडळाची एसटी बस म्हटले की, बस कधी येईल हे सांगता येत नाही असा अनेकांचा अनुभव असतो, बसचे टाईम माहित नसल्यामुळे शिवाय बसला किती उशीर होणार आहे याचीही माहिती नसल्यामुळे अनेकदा वाट पाहत बसावे लागते, अनेकदा आपल्यालाही हा अनुभव आला असेल.
एसटी बस ची नेमकी वेळ माहिती नसल्यामुळे तसेच सदरील बस सध्या कुठपर्यंत आलेली आहे हे सुध्दा माहित नसल्यामुळे अनेकदा बसची वाट पाहत बस स्थानकावर किंवा संबंधीत गावच्या थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागते. कधी बस उशीरा पोहोचते तर कधी वेळेअभावी आपली बस चुकते, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
अशा परिस्थितीत जर तुम्हाला बस स्थानकावर गेल्यावर किंवा घरूनच तुमच्या मोबाईलवर एका क्लिक वर ज्या बसने जायचे आहे ती बस आता कुठे आहे आणि त्या बसला किती वेळ लागणर आहे हे समजले तर किती बरे होईल. मात्र खरंच आता हे शक्य होणार आहे. कारण तुम्ही आता एका क्लिकवर बसचे लोकेशन पाहू शकणार आहात.
एका क्लिकवर बसचे लोकेशन :-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात MSRTC ने एक अॅप्लीकेशन म्हणजेच अॅप (MSRTC Commuters App) तयार केले असून या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला ज्या बसने जायचे आहे ती बस सध्या कुठे आहे, त्या बसला किती वेळ लागेल हे एका क्लिकवर कळणार आहे.
फक्त एवढंच नव्हे तर या अॅप मध्ये तिकीटाचे आरक्षण, बस लोकेशन ट्रॅकींग, बसचा मार्ग, महिला सुरक्षितता, गाडी मध्ये झालेला बिघाड, वैद्यकीय मदत तसेच आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना मदतीसाठी हेल्पलाईन देखील यामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय एसटी विषयी तुमचे मत, अभिप्राय, तक्रार देखील या अॅपमध्ये नोंद करण्याची सोय असणार आहे.
तुम्हाला जर एसटी बसशी संबंधित एखादी तक्रार नोंदवायची असल्यास तुमचा मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांक नोंदवावा लागणार आहे. म्हणजेच तुम्ही तक्रार सुध्दा नोंदवू शकणार आहात. यासोबतच एसटीचा नियंत्रण कक्ष, पोलीस व अॅम्ब्युलन्स यांना देखील थेट फोन करण्याची सुविधा देखील या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.
सदरील एसटी महामंडळाचे अॅप तयार झाले असून सध्या हे अॅप ट्रायल मोडवर चेक करणे सुरू आहे, म्हणजेच येत्या नोव्हेंबर पासून हे अॅप सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.