एल्गार न्यूज :-
कुंभार पिंपळगांव आणि परिसरात अवैध धंदे तर सुरूच आहे, पण मटका पण सुरू आहे. मटका म्हणजे अर्थातच जुगार आहे. ज्यामध्ये आतापर्यंत अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत आणि अशीच परिस्थिती राहील्यास अनेकजण यात अजून बर्बाद होतील.
कारण थोडे पैसे लावले तर जास्त पैसे मिळतील या लालसेने अनेक जण मटका खेळू लागले आहेत, अनेक जण तर असे आहेत जे कामाला जात नाही, मटका खेळूनच त्यांना श्रीमंत व्हायचं आहे, एकदा मटक्याची सवय लागली तर तो व्यक्ती पुन्हा परिश्रम करण्याची माणसिकता ठेवेल का हा प्रश्न आहे.
दिवसभर मोलमजूरी करायची आणि आलेल्या पैशातून मटका खेळायचा असे करणारे अनेकजण दिसून येतात, परंतू एकदा त्यांना मटका खेळायची सवय लागली तर नंतर ते कामाला जात नाही आणि मटक्यात पैसे हरल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत जाते.
घनसावंगी पोलीस ठाण्याने लायसन वाटले आहे का ?
आता तुम्ही म्हणाल की पोलीस ठाणे कुठे मटक्याचे लायसन देत असते का ? तर येथे दोनच गोष्टी असू शकतात, एक तर पोलीसांनी पान टपऱ्यांवर मटका सुरू ठेवण्याचे लायसन वाटले असतील नाही तर मग जो मटका पान टपऱ्यांवर सुरू आहे त्याला घनसावंगी पोलीस ठाण्याचा आशिर्वाद असेल.
कारण तिसरा पर्याय तर दिसत नाही, पोलीसांचे काम अर्थात कर्तव्य अवैध धंदे रोखायचे असते, परंतू जर त्यांच्या कार्यक्षेत्रात मटका व इतर अवैध धंदे चालत असतील तर वरील दोन गोष्टींपैकी तिसरी गोष्ट कोणाला दिसून येते का ? असा सवालही सर्वसामान्य जनता विचारत आहे.
कुंभार पिंपळगांवात साधारण 3 ते 4 पान टपऱ्यांवर मटका सुरू असल्याचे दिसून येते, बरं हे काही लपून छपून नाही सगळ्या गावाला माहित आहे की, काही पान टपऱ्यांवर मटका सुरू आहे. मग प्रश्न पडतो की, मटक्यावाल्यांचा काही हप्ता पोलीस ठाण्याला जात असेल का ? नसेल तर मग मटका सुरू कसा काय ? याचे उत्तर अजून लोकांना मिळालेले नाही.
वरिष्ठांनी कुंभार पिंपळगांव सुरू असलेल्या मटक्यासह इतर सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी, कारण तसे न केल्यास या अवैध धंद्यांना पोलीस ठाण्याचा आशिर्वाद आहे यावर शिक्कामोर्तब होईल आणि वरिष्ठांचीही याला मुक संमती आहे असा संदेश समाजात जाईल.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.