एल्गार न्यूज विशेष :-
Manoj Jarange Patil Maratha Aarakshan Sabha : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मराठा योध्दा म्हणून सर्वत्र परिचित झालेले मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या महाविराट सभेला नेमकी किती पब्लिक येणार ? समाज बांधव किती येणार ? अशी चर्चा आता होत आहे.
मराठा आरक्षणा निमित्त मनोज जरांगे पाटील यांच्या रूपी उठलेल्या या वादळाची दखल जवळपास सर्वच प्रमुख पक्षांना घ्यावी लागली आहे. राज्यभर त्यांचे होत असलेले दौरे आणि या दौऱ्यानिमित्त होणाऱ्या सभा सुध्दा प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहेत. अक्षरश: मध्यरात्री, पहाटे सुध्दा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने आंतरवाली येथे होणारी सभा अर्थातच रेकॉर्डब्रेक होणार आहे.
Manoj Jarange Patil Maratha Aarakshan Sabha
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सुरू केलेल्या दौऱ्यात एका दिवसात अनेक सभा होत आहेत, एवढंच नव्हे तर रात्री, मध्यरात्री, पहाटे सुध्दा सभा होत आहेत, अर्थातच त्यांच्या प्रत्येक सभेला प्रचंड गर्दी होत आहे, कदाचित त्यांना झोप घेण्यासाठी सुध्दा 2 – 3 तासच मिळत असावेत अशी परिस्थिती आहे.
आंतरवाली सराटी येथील सभेला किती पब्लिक येणार ?
प्राप्त माहितीनुसार आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्या सभेसाठी जवळपास 150 एकर जागा ठेवण्यात आली असून विविध ठिकाणी पार्किंगसाठी सुध्दा जवळपास 150 एकर जागा ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कदाचित सभास्थळाची जागा आणि पार्किंगच्या जागेत वाढ सुध्दा होवू शकते. कारण राज्यभरातून समाजबांधव या विराट सभेला प्रचंड मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यात माता भगीनींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे समाज बांधवांची सेवा म्हणून ठिकठिकाणी चहा, पाणी, नाष्टा इत्यादीची सुध्दा सोय करण्यात येत आहे.
आतापर्यंत जर जवळपास 150 एकर सभेसाठी आणि 150 एकर पेक्षा जास्त पार्किंगसाठी जागा ठेवण्यात आल्याचे दिसत असल्यामुळे आंतरवाली सराटी येथे येणाऱ्यांची संख्या अर्थातच काही लाखात असणार आहे.
एकूण परिस्थिती पाहता किती लाखात पब्लिक राहील याचा अंदाज कोणालाही बांधणे सध्यातरी अवघड आहे. मात्र तरीही काही बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ते 20 लाखाच्या पुढे हा आकडा जावू शकतो असा अंदाज काही बांधवांनी व्यक्त केला आहे.
आंतरवाली सराटी येथे दि.14 रोजी होणारी महाविराट सभा ही ऐतिहासिक किंवा इतिहासात नोंद होईल अशीच परिस्थिती आहे. कदाचित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुध्दा या सभेची नोंद होवू शकते असेही काही बांधवांचे मत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.
एल्गार न्यूजचे संपादक ,तथा आमचे मित्र परवेजभाई पठाण यांचे प्रथम अभिनंदन !
आपण एल्गार न्यूजच्या माध्यमातून अचूक आणि मुद्देसुद, प्रासंगिक वृत्त प्रकाशित करत आहात.एल्गार च्या माध्यमातून यापुढेही असेच सामाजिक सलोख्याचे,समाजजागृतीसाठी कारणीभूत ठरणारे वृत देत राहावे. अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.धन्यवाद।
मन:पूर्वक धन्यवाद…