Your Alt Text

मराठा समाजाचा एल्‍गार ! 24 तारखेपर्यंत आरक्षण दिले नाही तर पुढची जबाबदारी सरकारची ! | Manoj Jarange Patil Aarakshan Sabha

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
सरकारने समाजाच्‍या भावना लक्षात घेवून सरसकट मराठा समाजाला तात्‍काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसी मध्‍ये समावेश करावा, 24 तारखेपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आज दि.14 रोजी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्‍या विराट सभेला मनोज जरांगे पाटील यांनी संबोधित केले. यावेळी राज्‍यभरात लाखो मराठा समाज बांधव उपस्थित होते. सभास्‍थळ विविध घोषणांनी दणाणून गेले होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्‍य आाणि केंद्र सरकारला सुध्‍दा मराठा समाजाला आरक्षण देण्‍याबाबत तात्‍काळ पाऊल उचलण्‍याबाबत आवाहन केले आहे. यावेळी समाजाला संबोधित करतांना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, एकतर माझी अंत्‍ययात्रा निघेल नाही तर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल.

काही जण मराठा समाजाला उचकवण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत, परंतू मराठा बांधवांनी लक्ष विचलीत न होवू देता शांतता राखावी. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्‍याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही.

मला अटक करण्‍याच्‍या गोष्‍टी केल्‍या जात आहे, परंतू मला अटक करणे एवढं सोपं आहे का आता ? असेही त्‍यांनी सांगितले. सरकारने मराठा समाजाच्‍या भावना समजून घ्‍याव्‍या, आज मराठ्यांचे आग्‍या मोहोळ शांत आहे, एकदा का हे उठलं तर मग हे आरक्षण घेतल्‍याशिवाय शांत बसणार नाही.

केंद्र आणि राज्‍याला विनंती आहे की, हा गोरगरीब मराठा समाज शेती करून या देशाला अन्‍नधान्‍य पुरवतो, मराठा समाजाच्‍या पोरांना सुध्‍दा नोकरी लागली पाहीजे यासाठी समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्‍यासाठी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा.

सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं समाज तुम्‍हाला डोक्‍यावर घेईल. सरकारला 24 तारखेचा अल्‍टीमेटम दिलेला आहे, 24 तारखेच्‍या आत सरकारने तात्‍काळ मराठा आरक्षणाचा निर्णय घ्‍यावा.

सरकारकडून तात्‍काळ योग्‍य ती पाऊले उचलण्‍यात न आल्‍यास समाजाला 22 ऑक्‍टोबरला पुढे काय करायचे आणि पुढची दिशा काय असेल याची माहिती दिली जाईल असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!