एल्गार न्यूज विशेष :-
Maharashtra Voter List pdf : येत्या काळात निवडणूका होण्याची शक्यता आहे, निवडणूका म्हटले की, मतदान होणार आणि मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे, जर मतदार यादीत नाव नसेल तर आपल्याला मतदान करता येत नाही.
निवडणूक विभागाकडून वेळोवेळी मतदार यादी अपडेट केली जाते, म्हणजे नवीन नावे समाविष्ट केली जातात, शिवाय विविध कारणाने नावे वगळली सुध्दा जातात. म्हणजेच दुसऱ्या गावाला राहायला गेल्यास, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इत्यादी कारणामुळे नावे वगळली जातात, परंतू बऱ्याचदा अनावधानाने किंवा इतर कारणाने सुध्दा नावे वगळल्याचे प्रकार समोर येत असतात.
Maharashtra Voter List pdf
अनेकजण निवडणुकीच्या दिवशी मतदार यादी पाहत असतात, परंतू त्या दिवशी मतदार यादीत नाव नसेल तर काहीही करता येत नाही, त्यापेक्षा निवडणुका येण्यापूर्वीच आपले व आपल्या कुटुंबाची नावे मतदार यादीत आहे किंवा नाही हे माहित असणे आवश्यक आहे. नसता आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास आणि मतदानाच्या दिवशी यदाकदाचित आपले नाव यादीत नसल्यास आपल्याला मतदाना पासून वंचित रहावे लागू शकते.
How to Download Voter List PDF
येथे आपणास सोप्या पध्दतीने आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे फक्त 2 मिनिटात आपल्या मोबाईलवर कसे पहायचे किंवा आपल्या गावाची मतदार यादी (PDF) कशी डाउनलोड करायची याबाबत माहिती देण्यात येत आहे.
ग्रामपंचायत मतदार यादी pdf
- सर्वप्रथम आपण https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- आता आपल्यासमोर Chief Electroral Officer Maharashtra हे पेज उघडेल.
- आता स्क्रीनवर दिसत असलेल्या बॉक्स मध्ये जिल्हा निवडा.
- त्यानंतर आपली विधानसभा निवडा.
- त्याखाली कोणत्या भाषेत यादी हवी ती भाषा निवडा.
- आता भाग क्रमांक किंवा आपले गाव निवडा.
- त्यानंतर खालील चौकोनात बाजूला दिसत असलेला Captcha जशास तसा भरा.
- आता Open PDF वर क्लिक करा.
मित्रांनो, आता आपल्या समोर गावाची यादी ओपन होईल, ही पोस्ट आवडल्यास तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.