Your Alt Text

ई-केवायसी केली नाही तर गॅस सिलिंडरचे अनुदान बंद होणार ! | LPG gas e kyc online

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
LPG gas e kyc online : सरकार सर्वसामान्‍य नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी अनुदान देत असते, यामध्‍ये प्रामुख्‍याने उज्‍ज्‍वला योजना व सामान्‍य लाभार्थी यांचा समावेश आहे. सरकार सब्‍सीडीच्‍या माध्‍यमातून या लाभार्थ्‍यांना अनुदान देत असते. मात्र आता यासाठी सरकारने महत्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे.

उज्‍ज्‍वला व सामान्‍य लाभार्थ्‍यांना यापुढे गॅस सिलींडरसाठी अनुदान पाहीजे असल्‍यास ई-केवायसी करणे बंधनकारक करण्‍यात आले आहे. जे लाभार्थी ई-केवायसी करणार नाहीत त्‍यांना अनुदान मिळणार नाही. त्‍यामुळे शक्‍य तेवढ्या लवकर ekyc करणे आवश्‍यक झाले आहे.

ई-केवायसी का ?

उज्‍ज्‍वला व इतर लाभार्थी यांना सब्‍सीडीवर गॅस सिलेंडर देण्‍यात येते, परंतू सब्‍सीडी योजने अंतर्गत असलेला गोंधळ दूर करण्‍यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्‍याचे बोलले जात आहे. योग्‍य त्‍या लाभार्थ्‍यांना अनुदान मिळावे यासाठी सरकार प्रयत्‍नशील असल्‍याचे दिसत आहे.

तारीख वाढली !

यापूर्वी सदरील ई-केवायसी करण्‍यासाठी 31 डिसेंबर ही तारीख ठेवण्‍यात आली होती, परंतू सर्वर मध्‍ये अडचणी निर्माण झाल्‍या होत्‍या शिवाय अनेक लाभार्थी ई-केवायसी करण्‍यापासून वंचित राहीले होते, त्‍यामुळे शासनाने सदरील ई-केवायसीची तारीख वाढवली आहे.

ई-केवायसी कशी करणार !

गॅस सिलेंडरचे अनुदान यापुढेही सुरू ठेवण्‍यासाठी लाभार्थ्‍यांना जवळच्‍या गॅस एजन्‍सीवर जावून ई-केवायसी करून घ्‍यावी लागेल. सोबत आधारकार्ड, गॅस कनेक्‍शन डायरी, मोबाईल नंबर व बँक पासबुक आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी जवळच्‍या गॅस एजन्‍सीवर संपर्क साधावा.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!