Your Alt Text

काश्‍मीर मधील पहलगाम येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या निषेधार्थ कुंभार पिंपळगांव कडकडीत बंद !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
काश्‍मीर मधील पहलगाम येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या निषेधार्थ कुंभार पिंपळगांव येथील मार्केट मधील दुकाने बंद ठेवून निषेध व्‍यक्‍त करण्‍यात आला.

जम्‍मू काश्‍मीर मधील पहलगाम येथे दि.२२ रोजी दहशतवाद्यांनी नागरिकांवर गोळीबार केल्‍याने निष्‍पाप नागरिकांचा मृत्‍यू झाला होता. सदरील हल्‍ल्‍यामुळे देशभरात संतापाची लाट असून भारत सरकारने दहशतवाद्यांविरूध्‍द कठोर कारवाई करावी व पाकिस्‍तानला धडा शिकवावा अशी भावना सर्वस्‍तरातून व्‍यक्‍त होत आहे.

कुंभार पिंपळगांव येथे दि.२८ रोजी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिक व व्‍यापारी महासंघाच्‍या वतीने कुंभार पिंपळगांव बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून दहशतवादी हल्‍ल्‍याचा तिव्र शब्‍दात निषेध करण्‍यात आला.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!