एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव च्या उपसरपंच पदी संदिप (बबलू) कंटुले यांच्या मातोश्री सौ.शांताबाई लक्ष्मणराव कंटुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदरील निवड प्रक्रिया ही दि.२ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली.
उपसरपंच पदासाठी शांताबाई कंटुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संगीताताई लोंढे व निवडणूक सहाय्यक महादेव रूपनर यांनी उपसरपंच म्हणून शांताबाई कंटुले यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा केली.
शांताबाई कंटुले यांची निवड होताच गावात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. उपसरपंच शांताबाई कंटुले यांच्या निवडीबद्दल त्यांचा ग्रामपंचायत तसेच गांवकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संदिप कंटुले तसेच ग्रामपंचायत सदस्य, मित्र मंडळी व हितचिंतकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.