एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील दै.सकाळचे पत्रकार तथा शिक्षक तुकाराम शिंदे यांचे दि.२० रोजी पहाटे १.३० वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिर्थपुरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. वीस ते पंचवीस वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. तिर्थपुरी प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतांना त्यांनी तिर्थपुरीसह घनसावंगी तालुक्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर लिखाण केले. कृषि हा विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा होता.
तिर्थपुरीसह घनसावंगी तालुक्यातील जनतेचे प्रश्न सुटावेत, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील असणारा एक अनुभवी पत्रकार आज आपल्यात नाही. पत्रकार बांधवांनीही एक चांगला पत्रकार मित्र आणि सहकारी गमावला आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एल्गार न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली…