एल्गार न्यूज :-
Jitendra Awhad Controversial Statement : देशातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यावधी भाविक भक्त 22 जानेवारीची वाट पाहत आहेत, कारण या दिवशी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. प्रत्येकजण रामलल्ला केव्हा श्रीराम मंदिरात विराजमान होतात याची आतुरतेने वाट पाहत आहे. सगळीकडे भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे.
भारताच्या इतिहासात 22 जानेवारी हा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाणार आहे. देशभरासह जगभरातील कोट्यावधी भाविक भक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा आणि श्रध्देचा विषय आहे. सगळीकड या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी केली जात असून सर्वत्र उत्साह आणि भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे.
जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य !
प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सर्वत्र भक्तीय वातावरण असतांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे वनवासाच्या काळात मांसाहार करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने तमाम श्रीराम भक्त, हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.
अर्थातच नागरिकांमध्ये सदरील वक्तव्याबद्दल मोठ्या प्रमाणावर असंतोष पहायला मिळत असून प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल असंख्य भाविक भक्तांनी केला आहे. विविध पक्ष, संघटना तसेच श्रीराम भक्तांच्या वतीने ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करून पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
आता खेद व्यक्त !
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वत्र निषेध आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येत आहे. समस्त भाविक भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पहायला मिळत आहे. सदरील प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच जिेतेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेवून या वक्तव्या विषयी खेद व्यक्त करत असल्याचे सांगितले आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.