जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगल मध्ये किंवा थेट सर्च बॉक्स मध्ये https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/ ही वेबसाईट उघडा. आपणास खाली लिंक सुध्दा देण्यात येत आहे. ही वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला काही ऑप्शन दिसतील. ज्यामध्ये तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर ग्रामीण किंवा शहर निवडावे, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
त्याच्या खाली तुम्हाला Plot No. निवडायचे आहे. म्हणजे तुमचा जो गट नंबर आहे तो येथे टाकून सर्च सुध्दा करू शकता. किंवा तुम्हाला उजव्या बाजूस नकाशा दिसेल त्यातूनही तुम्ही गट नंबर सिलेक्ट करू शकता. तुम्हाला तुमचा आणि इतरांच्या गट नंबरचा नकाशा दिसेल. त्यातून तुम्ही गटाला झूम करून सुध्दा पाहू शकता.
तुम्ही समोर दिसत असलेला नकाशा डाउनलोड सुध्दा करू शकता. त्यासाठी नकाशावर एकदा क्लिक करावे लागेल, त्यानंतर Save Image as… यावर क्लिक केल्यास हा नकाशा तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.