एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सकल मराठा समाजाच्या वतीने दि.22 रोजी जालना जिल्हा बंद ठेवण्यात आला. सदरील बंद मध्ये जालना जिल्ह्यातील सर्व तालुके व विविध गावांमध्ये उत्स्फुर्तपणे बंद ठेवण्यात आला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेवून मागण्या मान्य कराव्यात यासाठी सदरील बंद ठेवण्यात आला आहे.
प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांचे सुरू असलेले आमरण उपोषण तात्काळ सोडविण्यात यावे, गेल्या वर्षभरापासून त्यांचे 6 वे आमरण उपोषण असून त्यांची तब्येत आता ढासळत आहे. त्यांच्या जिवीतास काही झाल्यास त्यास सरकार व प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
घनसावंगी तालुक्यातही बंद !
सदरील बंद मध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत, यामध्ये कुंभार पिंपळगांव येथे सुध्दा कडकडीत बंद ठेवून बंदला पूर्णपणे पाठींबा देण्यात आला आहे.