Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथील इस्‍माईल पठाण यांचे निधन

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील इस्‍माईल भाई पठाण यांचे बुधवार दि.24 रोजी अल्‍पशा आजाराने निधन झाले. मृत्‍यू समयी त्‍यांचे वय 62 होते.

स्‍व. इस्‍माईल हसनखॉं पठाण यांचे कुंभार पिंपळगांव सह परिसरातील नागरिकांशी चांगले संबंध होते. त्‍यांच्‍या अंत्‍यविधीला नातेवाईक, पाहुणे, मित्र परिवार व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहून दुख व्‍यक्‍त करत आपल्‍या संवेदना व्‍यक्‍त केल्‍या. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ज्‍येष्‍ठ पत्रकार इब्राहीम भाई पठाण व लतीफभाई पठाण यांचे ते बंधू होते, तर एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांचे ते चुलते होते, तसेच आयाज मेडिकलचे संचालक आयाज शेख यांचे ते मामा होते.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!