हा निसर्ग… हे शांतपणे वाहनारे वारे… हे अधून मधून किलबिल करणारे पक्षी कदाचित काही सांगू इच्छित असतील का ? काही सांगता येत नाही, पण असं ऐकलंय की, इले#शन नंतर किंवा येत्या काळात वातावरण बदलणार आहे ? पण नेमकं काय होणार आहे ?
येत्या काळात कदाचित….
- कुणाला थंडी मध्ये गर्मी होवू शकते !
- कुणाला उगाचच घाम फुटू शकतो !
- कुणाला वारंवार जर तर चे प्रश्न पडू शकतात !
- कोणी अचानक काहीतरी शोधू शकतात !
- कुणाचा अचानक बीपी वाढू शकतो !
- कुणाची अचानक छाती दुखू शकते !
- कुणाला विनाकारणच भिती वाटू शकते !
- कुणाला अचानक अस्वस्थ वाटू शकते !
- कुणाची वारंवार धावपळ होवू शकते !
- कुणाला काय काय लपवावं असं वाटू शकतं !
- कुणाला नको ती माणसं दारात आल्याचा भास होवू शकतो !
- कुणााला राहून राहून पश्चाताप होवू शकतो !
- कुणाला भितीदायक स्वप्न पडू शकतात !
- कोणी झोपेतून अचानक दचकून उठू शकतो !
- कुणाला अचानकच कोणाकोणाला फोन करावं असं वाटू शकतं !
- कुणाचे हातपाय उगाचच थरथर करू शकतात !
- कुणाचा अचानक मुळव्याध उठू शकतो !
- आणि कदाचित कुणाला इकडं पळावं की तिकडं पळावं असं सुध्दा होवू शकतं !
असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचं ऐकलं आहे…
थांबा… थांबा…. काळजी नसावी….
नेहमी हसत रहा, टेंशन मुक्त रहा, कोणावरही अन्याय करू नका, स्वत: आनंदाने जगा आणि इतरांनाही जगू द्या (जियो और जीने दो) अर्थातच नेहमी गंभीर विषयच वाचावे किंवा गंभीर बातम्याच वाचाव्यात किंवा पहाव्यात असं काही बंधन नाही.
राहिला प्रश्न वरील गोष्टींचा तर, नियम कायद्याचे आणि नैसर्गिक नियमांचे पालन करून इमानदारीने काम करणाऱ्या किंवा इमानदारीने आपली भुमिका बजावणाऱ्या चांगल्या लोकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण वरील सांगितलेल्या गोष्टी ह्या विनोदाचा भाग आहे.
…मात्र येत्या काळात यदाकदाचित वरील पैकी कोणतीही गोष्ट कुणासोबत घडल्यास हा निव्वळ योगायोग समजावा….