Your Alt Text

सिंदखेड येथील कृषि सहाय्यकाने केलेल्‍या कोट्यावधी रूपयांच्‍या भ्रष्‍टाचाराची तात्‍काळ चौकशी करून कारवाई करा नसता कृषि कार्यालयास टाळे ठोकणार ! – BRS

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी तालुक्‍यातील सिंदखेड व म.चिंचोली येथील कृषि सहाय्यकाने फळबाग व इतर योजनेत केलेल्‍या कोट्यावधी रूपयांच्‍या भ्रष्‍टाचाराची तात्‍काळ चौकशी करून संबंधित कृषि सहाय्यकास निलंबित करण्‍यात यावे अशी मागणी भारत राष्‍ट्र समितीच्‍या वतीने लेखी स्‍वरूपात करण्‍यात आली आहे.

भारत राष्‍ट्र समितीच्‍या वतीने देण्‍यात आलेल्‍या निवेदनानुसार मौजे सिंदखेड व म.चिंचोली (ता.घनसावंगी) येथील कृषि सहाय्यक हे शासनाची फसवणूक करीत आहेत. सन 2021-22 ते 2023-24 या आर्थिक वर्षात बोगस फळबाग लागवड, बोगस रोड निर्माण, तुती लागवड इत्‍यादी बोगस प्रकरणे करून बोगस अनुदान काढले आहे.

सदरील कृषि सहाय्यकाने बोगस प्रकरणे करून कृषि कार्यालयाच्‍या आशिर्वादाने व दोन्‍ही गावातील देवाणघेवाण करणाऱया मध्‍यस्‍थांच्‍या माध्‍यमातून कोट्यावधी रूपये फळबाग लागवड न करताच उचलले असून शासनाची फसवणूक करत अपहार केला आहे. तसेच अर्धे आम्‍ही अर्धे तुम्‍ही, रोजगार हमी अशा प्रकारे योजना लाटली असून शेकडो बोगस शेतकरी उभे करून कोट्यावधी रूपयांचा भ्रष्‍टाचार केला असल्‍याचे निवेदनात नमूद आहे.

सदरील कृषि सहाय्यकाने शासनाच्‍या कोणकोणत्‍या योजनेत व अनुदान वाटपात शासनाची फसवणूक केली आहे याची चौकशी समिती नेमुन भ्रष्‍टाचाराची चौकशी करावी आणि संबंधित कृषि सहाय्यकास निलंबित करावे, नसता भारत राष्‍ट्र समितीच्‍या वतीने दि01/10/2024 पासून तालुका कृषि कार्यालयास कुलुप ठोकून बेमुदत ऑफीस बंद आंदोलन करण्‍यात येईल असा इशारा भारत राष्‍ट्र समितीचे तालुकाप्रमुख सुभाष कोंडीबा आधुडे पाटील यांनी दिला आहे. तक्रारीचे निवेदन जिल्‍हाधिकारी जालना व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना यांना देण्‍यात आले आहे.

याबाबत जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.कापसे यांच्‍याशी संपर्क साधला असता सदरील तक्रार अर्ज मी अजून पाहिला नाही, मात्र संबंधितांनी आधी तालुका कृषि अधिकाऱ्यांना निवेदन देणे आवश्‍यक होते, तरी सुध्‍दा हे निवेदन तालुका कृषि अधिकाऱ्यांना देवून चौकशी करण्‍याबाबत सूचना देण्‍यात येईल असे सांगितले. तर तालुका कृषि अधिकारी सखाराम पवळ यांच्‍याशी संपर्क साधला असता तालुका कार्यालयास सदरील तक्रार अर्ज अद्याप प्राप्‍त झालेला नाही, तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतरच यावर बोलता येईल असे त्‍यांनी सांगितले.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!