Your Alt Text

दहशतवाद्यांना आणि हल्‍ल्‍याचा कट रचणाऱ्यांना त्‍यांच्‍या कल्‍पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार – नरेंद्र मोदी

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
काश्‍मीर मधील पहलगाम मध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. भारत सरकारने दहशतवाद्यांविरूध्‍द तसेच पाकिस्‍तान विरूध्‍द कठोर पाऊले उचलण्‍यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधील एका जनसभेला संबोधित करतांना म्‍हटले की, दहशतवाद्यांना आणि या हल्‍लयाचं कटकारस्‍थान रचणाऱ्यांना त्‍यांच्‍या कल्‍पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे.

सदरील जाहीर सभेतून त्‍यांनी सांगितले की, मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, भारत प्रत्‍येक दहशतवाद्याला आणि त्‍यांच्‍या पाठीराख्‍यांना ओळखेल, त्‍यांचा माग काढेल आणि त्‍यांना शिक्षा करेल. ज्‍यांनी हा हल्‍ला केला आहे त्‍या दहशतवाद्यांना आणि हल्‍ल्‍याचं कटकारस्‍थान रचणाऱ्यांना त्‍यांच्‍या कल्‍पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे, दहशतवाद्यांना शिक्षा मिळणार असून आता दहशतवाद्यांना मातीत मिळवण्‍याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्‍छाशक्‍ती आता दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारताने घेतले 5 मोठे निर्णय !

पहलगाम मधील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या निवासस्‍थानी दि.२३ रोजी बैठक होवून यामध्‍ये ५ मोठे निर्णय झाल्‍याचे परराष्‍ट्र सचिव विक्रम मिस्‍त्री यांनी सांगितले. ज्‍यामध्‍ये खालील ५ निर्णय घेण्‍यात आले आहेत.

  • सिंधू पाणी करार स्‍थगित करण्‍यात आला आहे.
  • पाकिस्‍तानातील भारतीय दुतावास बंद करण्‍यात आला आहे.
  • पाकिस्‍तानी नागरिकांना ४८ तासाच्‍या आत भारत सोडावा लागणार आहे.
  • वाघा – अटारी सीमा बंद करण्‍यात आली आहे.
  • पाकिस्‍तानी राजदूतांना भारत सोडावा लागणार आहे.

पाकिस्‍तानच्‍या मुळावर घाव !

दहशतदवादाचे केंद्रबिंदू असणाऱ्या पाकिस्‍तानने भारताविरूध्‍द केलेल्‍या दहशतवादी कारवायांमुळे त्‍याला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. आधीच भिक मागत जगभरात फिरणाऱ्या भिकारचोट पाकिस्‍तानला सिंधू करार स्‍थगित केल्‍यामुळे मोठा फटका बसणार आहे. कारण पाकिस्‍तानला ८० टक्‍के पाणी या नद्यांमधून मिळते, भारतातून जाणाऱ्या या नद्यांचे पाणी मिळाले नाही तर पाकिस्‍तानच्‍या शेतीसह वीज निर्मितीवरही परिणाम होणार आहे. तसेच प्रमुख शहरांच्‍या पाणी पुरवठ्यांवर सुध्‍दा परिणाम होणार आहे. एकूणच शेती, वीज, उद्योग धंद्यांसह अर्थकारण कोलमडणार असल्‍याचे दिसत आहे.

देशवासीयांची एकमुखी मागणी !

वारंवार दहशतवादी कारवाया करणाऱ्या व निष्‍पाप नागरिकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्‍तानवर अशी कठोर कारवाई करावी की त्‍यांच्‍या पुढच्‍या पिढ्यांनी सुध्‍दा भारता विरूध्‍द कटकारस्‍थान रचण्‍यापूर्वी १०० वेळा विचार करावा. दहशतवाद्यांचा बिमोड करण्‍यासाठी देशाने कठोरात कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी देशभरातून होत आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!