Your Alt Text

राज्‍य सरकारकडून देशी गायींना राज्‍यमाता – गोमाता घोषित करण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
प्राचीन काळापासून मानवाच्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये गायीचे अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. महाराष्‍ट्र सरकारने देशी गायींच्‍या संदर्भात आता एक महत्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार आता देशी गायीस राज्‍यमाता – गोमाता म्‍हणून घोषित करण्‍यात आले असून तसा जीआर सुध्‍दा काढण्‍यात आला आहे.

वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्‍व विचारात घेवून त्‍यांना कामधेनू असे संबोधण्‍यात येते. राज्‍यातील वेगवेगळ्या भागात देशी जातींच्‍या गायी आढळतात. उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्‍ट्रामध्‍ये खिल्‍लार, उत्‍तर महाराष्‍ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ इत्‍यादी गायी आढळून येतात. मात्र दिवसेंदिवस देशी गायींच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्‍याचे दिसून येत आहे.

देशी गायीच्‍या दुधाचे मानवी आहारात पौष्‍टीकदृष्‍ट्या अधिक मुल्‍य आहे. देशी गायींच्‍या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्‍वाचे अन्‍नघटक उपलब्‍ध असल्‍याने ते पुर्णअन्‍न आहे. देशी गायींच्‍या दुधाचे मानवी आहारातील स्‍थान, आयुर्वेद चिकित्‍सा पध्‍दतीत पंचगव्‍याचा वापर तसेच सेंद्रीय शेती पध्‍दतीत देशी गायींच्‍या शेण व गोमुत्राचे महत्‍व विचारात घेता, देशी गायींच्‍या संख्‍येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे.

सदरील पार्श्‍वभूमी लक्षा घेवून पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्‍यास प्रेरित करण्‍याच्‍या दृष्‍टीने आता शासनाने महत्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशी गायींचे एकूण महत्‍व लक्षा घेवून यापुढे देशी गायींना राज्‍यमाता – गोमाता म्‍हणून घोषित करण्‍यास शासनाने मान्‍यता दिली असून तसा जीआर सुध्‍दा काढण्‍यात आला आहे. शिवाय गोशाळांमधील देशी गायींच्‍या पालन पोषणासाठी प्रति गाय प्रति दिवस 50 रूपये अनुदान देण्‍याचा निर्णय सुध्‍दा घेण्‍यात आला आहे. शासनाच्‍या या निर्णयाचे सर्वस्‍तरातून स्‍वागत करण्‍यात येत आहे.

सर्वांचे प्रयत्‍न आवश्‍यक !

वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्‍व तसेच मानवी जीवनात सर्वच दृष्‍टीने गायींचे महत्‍व लक्षात घेता सर्वांनीच गायींच्‍या पालन पोषणास प्रोत्‍साहन देणे व त्‍यांची संख्‍या वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!