एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव – तिर्थपुरी रोडवर ज्येष्ठ नेते हिकमत उढाण यांच्या कारखान्याचे भुमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि.१४ रोजी दुपारी १२ वाजता होणार असून याच कार्यक्रमात हिकमत उढाण हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
हिकमत उढाण यांचा यापूर्वीच एक कारखाना असून आता पुन्हा एका कारखान्याचे भुमिपूजन करून हिकमत उढाण हे मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण दूर करणार आहेत. सदरील कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचा प्रश्न तर मार्गी लागणारच सोबत मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती सुध्दा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदरील कारखान्याचे भुमिपूजन होणार असून याच कार्यक्रमात हिकमत उढाण यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सुध्दा होणार आहे. सदरील कार्यक्रमात शिवसेनेचे जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वरिष्ठ नेते सुध्दा उपस्थित राहणार आहेत.