एल्गार न्यूज :-
शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे, अनंत अडचणींचा सामना करून शेतकरी बांधव विविध पिके घेत असतात, पिकांच्या वाढीसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात, मात्र कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटांमुळे शेतकरी हतबल होत आहेत.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव व परिसरात तसेच तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्वसामान्य शेतकरी या नुकसानीमुळे संकटात सापडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.26 रोजी रात्री अवकाळी पावसाला सुरूवात होवून पहाटेपर्यंत राज्यातील कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे, रात्री 1 ते 5 दरम्यान कुंभार पिंपळगांवसह परिसरातील गावांमध्ये सुध्दा वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सदरील वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील ज्वारी, तूर, कापूस व इतर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुंभार पिंपळगांव येथील शेतकरी संतोष टेकाळे यांनी जेव्हा शेतात जावून पाहीले तर त्यांना ज्वारी पीक पुर्णत: आडवे झालेले दिसले, अर्थात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
राज्यात झालेल्या सदरील पावसामुळे अनेक पिकांना दिलासा मिळाला असला तरी, वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यात प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.