एल्गार न्यूज (परवेज पठाण)
काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता, या सर्व कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रूपये दिले जातील व शिक्षण आणि रोजगारासाठीही प्रयत्न केले जातील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि.२९ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये मृतांच्या कुटुंबांना ५० लाख रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच त्यांच्या शिक्षण व रोजगारासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. या सोबतच जगदाळे कुटुंबातील एका मुलीला सरकारी नोकरी देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सदरील मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये पीक विमा योजनेत बदल करण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली असून ईव्ही धोरण निर्मितीसही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासह इतरही काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.