एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने बुलडाणा अर्बन व प्रकाश बिलोरे यांच्या संयुक्त विद्यमाने पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. ग्रामपंचायतच्या वतीने यापूर्वीच मोठे टँकर सुरू करण्यात आले आहे, त्याचाही लाभ असंख्य नागरिकांना होत आहे. परंतू छोट्या गल्ल्यांमध्ये सुध्दा पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नागरिक व ग्रामविकास युवा मंच च्या वतीने बुलडाणा अर्बन मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी या संस्थेला विनंती केली होती.
त्यानुसार बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटी शाखा कुंभार पिंपळगांव व ग्रा.पं.सदस्य प्रकाश बिलोरे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.7 रोजी कुंभार पिंपळगांव येथे मोफत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. सदरील पाण्याचे टँकर (ट्रॅक्टर) दिनांक 30/06/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचा प्रयत्न असून दररोज एक टँकर ट्रीप गावात वाटप करण्यात येणार आहे.
सदरील पाण्याच्या टँकरची सुरूवात संस्थेचे अध्यक्ष भाईजी व संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर, सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे बीड विभागीय व्यवस्थापक संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे स्थानिक संचालक भरतराव कंटूले, गिरधारीलाल कासट, अशोक राजेजाधव, ओमप्रकाश लोया, संदिप कंटुले, कुंभार पिंपळगांव शाखा व्यवस्थापक आशिष पालकर, तीर्थपुरी शाखा व्यवस्थापक गोविंद जोशी, घनसावंगी शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर बांडे, शाखा व्यवस्थापक वाशी स्वप्नील सूर्यवंशी, विकास गोस्वामी कर्मचारी मनोज काटे, गजानन पाटील, मंगेश निमदेव, विनायक तोंडे, बाबासाहेब रनमळे, संदीप लहामगे तसेच ग्रामविकास युवा मंच चे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.