एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
Free Education for Girls in Maharashtra : आता गरीबांच्या मुलींनाही कोणत्याही प्रकारचे शिक्षण मोफत घेता येणार आहे, कारण आता शासन सर्व जाती धर्माच्या मुलींना 800 पेक्षा जास्त विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Free Education for Girls in Maharashtra
गोरगरीबांच्या मुलींनाही उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असते, परंतू खूप खर्च लागत असल्यामुळे ते शक्य होत नव्हते, गरीब परिस्थितीमुळे अनेक मुली इच्छा असतांनाही उच्च शिक्षण घेवू शकत नव्हत्या. आज घडीला उच्च शिक्षणाच्या फी मध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि त्यामुळे आलेल्या मर्यादेमुळे अनेक गरीब व सामान्य कुटुंबातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत होत्या.
गरीब मुलींसाठी महत्वाची घोषणा !
शासन येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना मेडीकल, इंजिनिअरिंग, विधी यासह जवळपास 642 अभ्यासक्रमाचे तसेच नव्याने सुरू होणाऱ्या 200 अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.
मेडीकल, इंजिनिअरिंग सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रूपये खर्च होत असतात, मेडीकलचे म्हणजेच वैद्यकीय शिक्षण घेणे तर गोरगरीबांच्या मुलींना शक्यच नव्हते, परंतू आता गोरगरीबांच्या मुलींना वैद्यकीय शिक्षणासह, इंजिनिअरींग, विधी व इतर 642 व नव्याने सुरू होणाऱ्या 200 अशा 842+ अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत मिळणार आहे.
शुल्क शासन भरणार !
राज्यातील मुलींना कला, विज्ञान, वाणिज्य सोबतच वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी, फार्मसी अशा शेकडो अभ्यासक्रमासाठी असलेली 100% फीस राज्य सरकार भरणार आहे. चालू वर्षापासूनच ही योजना लागू करण्यात येणार आहे. लवकरच या बाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलांसाठीही निर्णय घ्यावा !
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी 8 लाखांच्या आत कुटुंबाचे उत्पन्न असलेल्या गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना सर्व प्रकारचे उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली आहे त्याचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मात्र यासोबतच शासनाने 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.