एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
राज्यात नुकतीच विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक पार पडली. सदरील निवडणुकीत जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात अत्यंत अटीतटीचा सामना पहायला मिळाला, यामध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण हे विजयी झाले. या निमित्त आमदार डॉ.हिकमत उढाण यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र तौर व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सदरील सत्कार समारंभ दि.४ रोजी एस.पी.हायस्कूल, लिंबी रोड, मुर्ती येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला असून सदरील कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सदरील सत्कार समारंभाला घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील पुरूष, महिला, युवक – युवती, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र तौर यांनी केले आहे.