Your Alt Text

शेतकऱ्यांच्‍या बॅंक खात्‍यात 5 तारखेला जमा होणार 4 हजार रूपये !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
निवडणुकीच्‍या दृष्‍टीने आचारसंहिता लागण्‍यापूर्वीच केंद्र आणि राज्‍य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्‍याचा प्रयत्‍न करत असल्‍याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्‍या खात्‍यात पैसे पाठवून महिलांना खुश केल्‍यानंतर आता सरकारने मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवल्‍याचे दिसत आहे.

केंद्र सरकार पीएम किसान सन्‍मान निधी योजने अंतर्गत वर्षभरात 2000 रूपयांचे 3 हप्‍ते शेतकऱ्यांना देत असते, म्‍हणजेच वर्षाला 6000 रूपये शेतकऱ्यांना मिळत असतात. याच योजनेच्‍या धर्तीवर महाराष्‍ट्र सरकारने सुध्‍दा नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजना सुरू केली असून केंद्र सरकार प्रमाणेच वर्षभरात 2000 रूपयांचे 3 हप्‍ते शेतकऱ्यांना दिले जातात. आता या दोन्‍ही योजनांचे हप्‍ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा करण्‍याचे नियोजन आहे. म्‍हणजेच शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात आता 4 हजार रूपये जमा होणार असल्‍याचे दिसत आहे.

मोदींच्‍या हस्‍ते वितरण !

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते शनिवार दि.5 रोजी सकाळी 11 वाजता वाशिम जिल्‍ह्यातील एका समारंभा मधून ही रक्‍कम (ऑनलाईन माध्‍यमातून) वितरीत केली जाणार आहे. यावेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, यवतमाळ- वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्‍यासह अनेक मान्‍यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्‍या हस्‍ते केंद्र शासनाच्‍या पीएम किसान सन्‍मान निधी योजने अंतर्गत 2000 व राज्‍य सरकारच्‍या नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजने अंतर्गत 2000 असे एकूण 4000 रूपये शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात दि.5 रोजी येणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. येत्‍या काही दिवसात आचारसहिता केव्‍हाही लागू शकते, ही बाब लक्षात घेवून केंद्र आणि राज्‍य शासनाने दोन्‍ही योजनांचे हप्‍ते शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात टाकण्‍याचे नियोजन केल्‍याचे दिसत आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!