एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
आजकाल कोण काय करेल याचा अंदाज नाही, काही लोकांना वाटतं की ते गुन्हा करून वाचतील, त्यांना कोणीही पकडणार नाही, त्यांची तोतयागिरी कायम सुरूच राहील, परंतू त्यांना हे माहित नाही की, गुन्हेगार कितीही हुशार असो तो एक ना एक दिवस पकडलाच जातो.
असाच एक प्रकार समोर आला आहे. हैद्राबाद येथे जडाला मालविका नावाची एक तोतया महिला पोलीस (RPF) जेव्हा साखर पुड्याच्या कार्यक्रमात पोलीस ड्रेस मध्येच सहभागी झाली तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला वेगळे वाटले आणि त्याला संशय आला, त्याने लगेचच याबाबतीत संबंधित विभागात माहिती घेतली असता अशा नावाची महिला कर्मचारी आमच्या विभागात कार्यरत नसल्याचे कळाले आणि या तोतया आरपीएफ महिला कर्मचाऱ्याचे बिंग फुटले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदरील मुलीचे अथवा महिलेचे नाव मालविका असून या महिलेने एका प्रतिष्ठीत विद्यालयात केमिस्ट्री मध्ये मास्टर डिग्री घेतलेली आहे. तिच्या जवळ काहीही काम नव्हते, तिला खाकी (वर्दी) विषयी खूप आकर्षण होते. मालविकाने 2018 मध्ये आरपीएफ मध्ये एसआय (सब इन्सपेक्टर) भर्ती प्रवेश परीक्षाही दिली होती परंतू मेडिकल टेस्ट मध्ये ती नापास झाली होती. त्यामुळे तिची निवड होव शकली नाही. त्यानंतर मालविका निराश राहू लागली.
2023 मध्ये तिने अचानक निर्णय घेतला की, नोकरी लागो अथवा न लागो, पोलीसांप्रमाणेच तिने राहण्याचे ठरवले. तिने घरच्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आरपीएफ मध्ये नोकरी लागल्याचे भासवले. तिच्या मध्ये पोलीसांच्या पोशाखा (वर्दी) विषयी एवढे आकर्षण होते की, ती जेथे पण जाईल तेथे पोलीस ड्रेस मध्येच असायची.
मालविका ट्रेन मध्ये असो, पुजापाठचा कार्यक्रम असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो पोलीस ड्रेस मध्येच राहत होती. त्यामुळे मालविकाला प्रत्येक जण खरोखरची आरपीएफ सब इन्स्पेक्टर (उपनिरीक्षक) समजत होता. एवढंच नव्हे तर एका मोठ्या कार्यक्रमात महिला दिवसा निमित्त मुख्य प्रवक्ता म्हणून तिला आमंत्रीत करून तिचा सत्कारही करण्यात आला होता.
पोलीसांसारखाच ड्रेस !
मालविकाने पोलीसांसारखेच दिसावे म्हणून हुबेहुब ड्रेस उपलब्ध केला, त्या वर्दीवर स्टार, नेम प्लेट घेतले. तसेच बूट, लॅमिनेटेड ओळखपत्र अशा सर्व बनावत गोष्टी तयार करून घेतल्या. नोकरी लागल्याचे भासवून ती कुटुंबासह नातेवाईकांकडे ड्रेस मध्ये ये-जा करत होती. अनेकदा ती रेल्वे गाडी मध्ये पोलीस अधिकारी म्हणून फिरत होती.
तोतया अधिकारी असल्याचे उघड !
प्राप्त माहितीनुसार मालविका जेव्हा साखर पु्ड्याच्या कार्यक्रमात पोलीस ड्रेस मध्ये आल्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला थोडा संशय आला, होणाऱ्या नवऱ्याने याबाबत संबंधित विभागात माहिती घेतली असता मालविका नावाची कोणीही व्यक्ती आमच्याकडे कार्यरत नाही असे कळाले आणि मालविकाची तोतयागिरी उघड झाली.
पोलीसांनी मालविकाला अटक केली असून विविध कलमान्वये तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मागील काळात तिने अजून काही चुकीचे काम केले आहे का याचाही तपास सुरू आहे. मालविकाने तोतयागिरी करून अनेकांना पोलीस असल्याचे भासवल्यामुळे कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक व मित्रांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” बटनाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.