Your Alt Text

फडणवीस यांनी मुख्‍यमंत्री तर शिंदे व पवार यांनी घेतली उपमुख्‍यमंत्री पदाची शपथ ! मंत्रिमंडळाचा विस्‍तार लवकरच !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री म्‍हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्‍यमंत्री म्‍हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी दि.5 रोजी शपथ घेतली आहे. राज्‍यपाल सी.पी.राधाकृष्‍णन यांनी देवेंद्र फडणवीस आणि दोन्‍ही उपमुख्‍यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सदरील शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदावर पार पडला.

सदरील भव्‍यदिव्‍य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन, तसेच विविध राज्‍याचे मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री, एनडीए घटक पक्षाचे नेते, इतर राजकीय नेते, साधू-संत, महंत, उद्योगपती, बॉलीवुड मधील मंडळी यांच्‍यासह जवळपास 40 हजार नागरिक उपस्थित होते.

महाराष्‍ट्राच्‍या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत प्राप्‍त केले असून 288 पैकी 236 जागांवर महायुतीला यश प्राप्‍त झाले आहे. भाजपला 132, शिवसेनेला 57, तर अजित पवारांच्‍या राष्‍ट्रवादीला 41 जागा मिळाल्‍या आहेत. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्‍यमंत्री झाले आहेत. पहिल्‍यांदा 2014-2019 व त्‍यानंतर 72 तासांसाठी दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदा ते मुख्‍यमंत्री पदी विराजमान झाले आहेत.

एकनाथ शिंदे हे पहिल्‍यांदा उपमुख्‍यमंत्री झाले असून अजित पवार हे सहाव्‍यांदा उपमुख्‍यमंत्री म्‍हणून विराजमान झाले आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्‍तार होणार आहे, मात्र यामध्‍ये कोणत्‍या आमदाराला संधी मिळणार हे अद्याप स्‍पष्‍ट नसले तरी तिन्‍ही प्रमुख पक्षाने वरिष्‍ठ नेते यावर चर्चा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्‍यमंत्री पदाची शपथ घेतल्‍यानंतर मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत 5 लाख रूपये मदतीच्‍या एका फाईलवर सही करून कार्याला सुरूवात केली आहे.

विशेष अधिवेशन !

लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्‍तारानंतर लगेचच खातेवाटप जाहीर करण्‍यात येणार आहे. अर्थातच आपापल्‍या पक्षाला चांगली खाती मिळावी म्‍हणून तिन्‍ही सत्‍ताधारी पक्ष प्रयत्‍नशील आहेत. येत्‍या 7, 8 आणि 9 तारखेला विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून यामध्‍ये आमदारांना शपथ दिली जाणार आहे, याच अधिवेशना मध्‍ये विधानसभा अध्‍यक्षांची सुध्‍दा निवड केली जाणार आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!