Your Alt Text

एचएचआय कंपनीच्‍या माध्‍यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्‍या संधी ! – सरदार संतोखसिंह

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
हॅप्‍पी हेल्‍थ इंडिया (HHI) च्‍या माध्‍यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्‍ध झाली आहे. तसेच युवक युवती आपले शिक्षण करतांना सुध्‍दा पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करू शकतात असे प्रतिपादन एचएचआय कंपनीचे सीईओ सरदार संतोखसिंह यांनी केले आहे.

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे दि.२६ रोजी एचएचआय कंपनीच्‍या माध्‍यमातून आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना त्‍यांनी सांगितले की, एचएचआय कंपनी सर्वच प्रोडक्‍टच्‍या विक्रीतून शासनाला पूर्ण कर भरते. एचएचआय कंपनीच्‍या माध्‍यमातून घराघरात उद्योजक तयार करण्‍याचे आमचे ध्‍येय आहे. या माध्‍यमातून प्रत्‍येक घरातील व्‍यक्‍ती वेलनेस प्रोडक्‍टच्‍या माध्‍यमातून निरोगी राहू शकेल शिवाय बेरोजगारीवर सुध्‍दा मात करू शकेल असे त्‍यांनी सांगितले.

यावेळी एचएचआय कंपनीचे ब्‍लॅक डायमंड अॅचीव्‍हर अशोकराव ओवळे यांनी सांगितले की, शासन सर्वांनाच नोकऱ्या देवू शकत नाही, म्‍हणून प्रत्‍येकाने हा व्‍यवसाय करणे काळाची गरज बनली आहे. वाढत्‍या बेरोजगारीवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने तसेच निरोगी आयुष्‍य मिळवण्‍याच्‍या दृष्‍टीने एचएचआय हे एक उत्‍कृष्‍ट माध्‍यम आहे.

एचएचआय कंपनी मध्‍ये गुड मॉर्निंग ते गुड नाईट लागणारे सर्व ऑर्गेनिक प्रोडक्‍ट आहेत. ज्‍यामध्‍ये एफएमसीजी, वेलनेस, अॅग्रीकल्‍चर, वेटर्नरी, शुजवेअर, गारमेंट्स, ब्‍युटी केअर इत्‍यादी सर्व प्रोडक्‍ट उपलब्‍ध आहेत. एचएचआय कंपनीच्‍या वेलनेस सप्‍लीमेंट च्‍या माध्‍यमातून देशात जवळपास सर्वच राज्‍यात असंख्‍य रूग्‍णांना फायदा होत आहे. त्‍यामुळे लाखो नागरिक या कंपनीशी जुळत आहेत. त्‍यामुळे लाखो लोकांना रोजगाराचे सुध्‍दा माध्‍यम या कंपनीच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध झाल्‍याचे मत अशोक ओवळे यांनी व्‍यक्‍त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणून सीएमडी सरदार संतोखसिंह होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून वसंतराव (बप्‍पा) उढाण, भरतराव कंटुले, रामेश्‍वर लोया हे होते. प्रास्‍ताविक माणिकराव ढगे यांनी केले तर आभार अशोक ओवळे यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला एचएचआय कंपनीचे माणिकराव ढगे, आसाराम तायडे, संजय काळे, महादेव निचळ, परमेश्‍वर लहाने, डॉ.नरेंद्र भांदुर्गे, डॉ.मनिषा भांदुर्गे, मुक्‍ताताई गायकवाड, जयश्री चव्‍हाण, उषा फुके, कुसूम ढेकळे, वाल्मिक ढेकळे, गजानन टेंभुरकर, महादेव नलावडे यांच्‍यासह कुंभार पिंपळगांव सह परिसरातील तसेच जालना जिल्‍हा व जिल्‍ह्या बाहेरील सुध्‍दा अनेक मान्‍यवर उपस्थित होते.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!