Your Alt Text

एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांना ‘उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार’ जाहीर

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
जालना जिल्‍ह्यातील पत्रकार तथा एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांना पुणे येथील आघाडीची वृत्‍त संस्‍था प्रेस मीडिया लाईव्‍ह तर्फे दिला जाणारा “उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार” जाहीर करण्‍यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखणीय कामगिरीची दखल घेवून सदरील पुरस्‍कारासाठी परवेज पठाण यांची निवड करण्‍यात आल्‍याचे प्रेस मीडिया लाईव्‍ह चे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांनी सांगितले आहे.

प्रेस मीडिया लाईव्‍हचा सदरील पुरस्‍कार सोहळा सांगली (महाराष्‍ट्र) येथे दि.२० एप्रिल रोजी मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होणार आहे. तत्‍पूर्वी सदरील पुरस्‍काराची घोषणा करण्‍यात आली आहे. प्रेस मीडिया लाईव्‍ह तर्फे दर वर्षी राज्‍यासह देशातील पत्रकारिता क्षेत्रात उल्‍लेखणीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्‍कार देवून सन्‍मान केला जातो. यंदा पत्रकारांसाठीचा हा सोहळा सांगली येथे आयोजित करण्‍यात आला आहे.

परवेज पठाण यांच्‍या बद्दल थोडक्‍यात !

परवेज पठाण हे एल्‍गार न्‍यूज या ऑनलाईन न्‍यूज पोर्टलचे संपादक असून एल्‍गार न्‍यूज च्‍या माध्‍यमातून नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या, संपादकीय आर्टीकल प्रकाशित केले जातात. परवेज पठाण हे पत्रकारिता पदवीधर (Bachelor of Mass Communication & Journalism) असून पत्रकारिता क्षेत्रात मागील १७ वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच मागील २३ वर्षांपासून कॉम्‍प्‍यूटर क्षेत्रातही कार्यरत असून ते एक ग्राफीक डिझायनर सुध्‍दा आहेत. शिवाय त्‍यांनी यापूर्वी विविध विषयांवरील ब्‍लॉगवर सुध्‍दा काम केले आहे.

डिजिटल मीडिया क्षेत्रात त्‍यांची सक्रीय भुमिका असून Web Development वर सुध्‍दा त्‍यांचे काम सुरू आहे. परवेज पठाण हे कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील ज्‍येष्‍ठ पत्रकार इब्राहीम पठाण यांचे चिरंजीव आहेत.

परवेज पठाण हे मागील काळात राज्‍यातील एका डिजिटल मीडिया असोसिएशनचे प्रदेश उपाध्‍यक्ष सुध्‍दा राहीलेले आहेत. राज्‍यातील प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया व इलेक्‍ट्रॉनिक मीडियातील पत्रकार तसेच विविध पत्रकार संघटनांशी त्‍यांचे चांगले संबंध असून पत्रकारांचे प्रश्‍न व समस्‍यांविषयी सुध्‍दा ते वेळोवेळी लिखाण करत असतात.

यापूर्वी २०१६ मध्‍ये परवेज पठाण यांनी जालना जिल्‍ह्यातील पत्रकारांसाठी ६ महिने अथक प्रयत्‍न करून निस्‍वार्थ भावनेतून “जालना जिल्‍हा पत्रकार संपर्क डायरी” काढली होती व मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत त्‍याचे प्रकाशनही करण्‍यात आले होते, तसेच सदरील डायरी जिल्‍ह्यातील सर्व पत्रकार बांधवांपर्यंत मोफत पोहोच करण्‍यात आली होती. सदरील १६४ कलर पानांच्‍या डायरी मध्‍ये जिल्‍ह्यातील पत्रकारांचे नाव, गांव, फोटो, वृत्‍तपत्राचे नाव, मोबाईल नंबर इत्‍यादी माहिती होती. मागील 18 वर्षांपासून सुरू असलेल्‍या सवेरा डिजिटल या फर्मचे परवेज पठाण हे प्रमुख आहेत.

जनहिताची पत्रकारिता !

परवेज पठाण यांचे सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्‍याशी चांगले संबंध असले तरी परवेज पठाण हे कोणत्‍याही पक्षाचे सदस्‍य नाहीत, तसेच कोणाचेही समर्थक अथवा विरोधक नाहीत. १५ महिन्‍यांपूर्वी एल्‍गार न्‍यूजची सुरूवात झाल्‍यापासूनच विशेष करून घनसावंगी मतदारसंघ व जालना जिल्‍ह्यासह राज्‍यातील जनतेचे प्रश्‍न लेखणीच्‍या माध्‍यमातून मांडण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. रोखठोक बातम्‍यांमुळे जालना जिल्‍ह्यात एल्‍गार न्‍यूज क्र.१ चे न्‍यूज पोर्टल म्‍हणून ओळखले जात असून आतापर्यंत लाखो वाचकांनी या पोर्टलला पसंती दिली आहे.

मान्‍यवरांकडून शुभेच्‍छा !

एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांना उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार जाहीर झाल्‍याबद्दल पत्रकार बांधव, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्‍यापारी, उद्योजक, व्‍यावसायिक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, मित्रमंडळींसह विविध क्षेत्रातील मान्‍यवरांकडून अभिनंदन करून शुभेच्‍छा देण्‍यात येत आहेत.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!