एल्गार न्यूज :-
राज्यात यावर्षी सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस पडलेला आहे, शासनाने काही दिवसांपूर्वी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता, परंतू राज्यातील इतर तालुक्यांमध्ये सुध्दा दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती.
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे काही दिवसांपूर्वी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणत आला होता, मात्र राज्यातील उर्वरित बहुतांश तालुक्यातील महसूली मंडळांमध्ये जुन ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा आणि 750 मी मी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे.
त्यामुळे शासनाने राज्यातील 1021 महसूली मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. यामुळे आता दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या वीज बिलात 33.5 टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता करण्यात येत आहे.
तसेच आवश्यक तेथे पाणी तिथे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती 1021 महसूल मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत.
तसेच दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार संबंधित समितीला देण्यात आलेले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या राज्यातील विविध तालुक्यातील 1021 महसूली मंडळे कोणती याची माहिती अथवा शासनाचा GR डाउनलोड येथे डाउनलोड करू शकता.
तुमच्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर झाली आहे ते पाहण्यासाठी खालील लिंक द्वारे GR डाउनलोड करा….
शासनाचा GR डाउनलोड करा…
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.