मच्छिमाराला सापडलेली मौल्‍यवान वस्‍तू कोणती ?

सदरील घटना ही स्‍कॉटलँडमधील आहे. येथील पॅट्रीक नावाचा मच्छिमार त्‍याच्‍या कुत्र्याला घेवून समुद्र किनारी गेला होता, तेव्‍हा कुत्र्याला समुद्रात चमकणारी वस्‍तू दिसली, जेव्‍हा त्‍याच्‍या मालकाला ही वस्‍तू दिसली तेव्‍हा तो प्रचंड आनंदी झाला कारण ही वस्‍तू अत्‍यंत मौल्‍यवान होती.

कुत्र्याला सापडलेली मौल्‍यवान वस्‍तू ही व्‍हेल माशाची उलटी होती, ज्‍याला Ambergris असेही म्‍हटले जाते. आपणास वाटेल यात काय विशेष परंतू आपल्‍याला कदाचित माहित नसेल पण व्‍हेल माशाची उल्‍टीची किंमत कोटींमध्‍ये असते. दिसायला ही वस्‍तू सोन्‍यासारखी असते, ही वस्‍तू सहजासहजी सापडत नाही.

व्‍हेल माशाच्‍या उलटीचा वापर ब्‍युटी इंडस्‍ट्रीमध्‍ये केला जातो, उच्‍च दर्जाचे परफ्यूम तयार करण्‍याचा त्‍याचा वापर केला जातो, याआधीही काही लोकांना अॅम्‍बरग्रीसचा तुकडा सापडला होता, ज्‍याची किंमत कोटी मध्‍ये आहे. परंतू व्‍हेल माशाची उलटी अर्थात अॅम्‍बरग्रीस सापडणे दुर्मिळ असते. कधीतरी एखाद्याला सापडत असते. त्‍यामुळे असं काही शोधण्‍याचा विचार मनात आणू नका बरं का, आपलं जे चाललंय त्‍याकडेच थोडं जास्‍त लक्ष द्या, कदाचित त्‍यातूनही नशीब बदलू शकते.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!