Your Alt Text

निवडणुकीत महायुतीच्‍या उमेदवारा विरोधात लढणाऱ्यांना पक्षात प्रवेश देवू नका ! – अंकुशराव बोबडे

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत सहभागी पक्षातील उमेदवारा विरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराला महायुतीच्‍या कोणत्‍याही पक्षात प्रवेश देवू नये अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अंकुशराव बोबडे यांनी केली आहे.

घनसावंगी मतदारसंघासह जालना जिल्‍ह्यातील पाचही मतदारसंघात निवडणुकीमध्ये महायुतीच्‍या उमेदवारा विरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराला महायुतीच्‍या कोणत्‍याही पक्षात घेतल्यास कार्यकर्त्‍यांमध्‍ये नाराजी निर्माण होवू शकते. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीला २३२ जागा मिळालेल्या असून त्यातील एकट्या भारतीय जनता पक्षाला १३२ जागा मिळाल्या आहेत अशा परिस्थितीत महायुतीची सर्व बाजू भक्कम असताना ज्या उमेदवारांना जनतेने नाकारले त्‍या उमेदवारांना पक्षात घेणे योग्‍य ठरणार नाही.

स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता महायुतीमध्ये कुणालाही प्रवेश देऊ नये. महायुतीला नुकसान होईल अशा नेत्यांना कुणीही प्रवेश देऊ नये. महायुतीच्‍या उमेदवारा विरोधात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना महायुतीत सहभागी पक्षात प्रवेश दिल्‍यास पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या व महायुतीला मताधिक्य मिळवून देणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी भावना महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे मत अंकुशराव बोबडे यांनी व्‍यक्‍त केले आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!