Your Alt Text

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी दिगंबर गुजर यांची फेरनिवड

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या जालना जिल्हाध्यक्षपदी दिगंबर गुजर यांची फेरनिवड राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी केली आहे. पुणे येथील आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नूतन राज्याध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव देंडे, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, मराठवाडा विभागीय अनिल सावंत यांच्या सूचनेवरून ही निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्या ध्येय धोरणाच्या आधीन राहून आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करण्याचे काम करावे असे श्री.आरोटे यांनी फेरनियुक्तीपत्रात म्हटले आहे. या निवडीबद्दल गुजर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!