एल्गार न्यूज :-
धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे तर्फे सारथी (SARTHI) संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर अशोक काकडे (IAS) यांचा राजस्थान हायकोर्ट चे माजी मुख्य न्यायाधीश संभाजीराव शिंदे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन विशेष कार्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे आयोजीत आदर्श माता जीवन गौरव पुरस्कार सौ. दुर्गाताई सुधीर तांबे व श्रीमती कमल जयकुमार मोरे, ज्येष्ठ विधीज्ञ जीवनगौरव पुरस्कार ॲड. सखाराम कोळसे पाटील व ॲड. प्रताप परदेशी, विशेष कार्य जीवन गौरव पुरस्कार सुभाष देशमुख व छत्रपती संभाजीनगर चे माजी खासदार उत्तमसिंग पवार यांना देण्यात आला.
अवॉर्डस् ऑफ ऑनर पुरस्कार अशोक काकडे (IAS) व माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, विशेष कार्य गौरव पुरस्कार उद्योगपती गणेश निबे, निवृत्त एअर वाईस मार्शल निखिल चिटणीस व भारतीय बेस बॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर या सर्वाना 2022 व 2023 चे पुरस्कार देऊन सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच ॲड रमेशराव धोर्डे पाटील, सिनीयर काऊंसिल, बॉम्बे हायकोर्ट व माजी डीजीपी ॲड. विलासराव धोर्डे, पाटील, यांचे 72 वयात पदार्पण केल्या बद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे नुकत्याच झालेल्या भव्य व दिमाखदार सोहळ्यात हा कार्यक्रम पार पाडला. प्रथम ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र धोर्डे पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.
या प्रसंगी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा कुटुंबीयांना व आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5-00 वाजता, बालगंधर्व रंगमंदिर जंगली महाराज रोड पुणे येथे, हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी श्री संभाजीराव शिवाजीराव शिंदे मुख्य न्यायाधीश (निवृत्त) राज्यस्थान हायकोर्ट, यांनी प्रेक्षकांना संबोधित करताना सांगितले की आत्महत्या हा अंतिम निर्णय असु शकत नाही. तर, जिद्दीने ,कठीण प्रसंगांना सामोरे जावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणात, तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले यशाचे शिखर सर करावे.
जीवनात शिक्षणालाच सर्वात जास्त महत्व आहे. शालेय शिक्षणा पासुन उच्च शिक्षणा पर्यंत कोणीही चिकाटी व जिद्द सोडू नये. पद्मश्री परशुराम खूने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कला क्षेत्रात, झाडीपटटी सारखे नाटकाचे प्रयोग करून गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात देखील नलक्षवाद कमी करून, कला क्षेत्रात उद्योगनिर्मिती करून जनेतेला रोजगार उपलब्ध करून दिला.
श्री खुने यांनी पुर्व विदर्भातील गरीब लोकांचे प्रश्न प्रखर पणे मांडले. यशदा पुणे चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड (IAS) यांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये, मार्केट मध्ये मागणी असलेल्या पिकांची लागवड करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी व कायद्याचे वाचन करून आपले मुलभूत अधिकार जाणून घेऊन आपले दैनंदिन जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत.
सध्याचे समाजातील बदलते चित्र देखील त्यांनी कार्यक्रमात मांडले. श्री.गायकवाड पुढे म्हणाले की, आत्ताच व्यासपीठावर धोर्डे पाटील यांच्या कुटुंबाचे पुस्तक वाचत असताना लक्षात आले की, धोर्डे कुटुंबांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य फार मोलाचे आहे.
नगर जिल्ह्य़ातील, पुणतंब्यावरून पलीकडे गोदावरी नदी चे पात्र ओलांडून, मुगलशाही मधील वैजापूर तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या, डोणगाव मध्ये मारुती बापूजी धोर्डे पाटील यांनी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांना एवढया कठीण काळात कश्या प्रकारे आश्रय दिला. याचा ऊललेख केला व त्यांच्या कुटुंबाकडून हे समाजकार्य आज देखील श्री राजेंद्र धोर्डे पाटील व संपूर्ण धोर्डे कुटुंबीय अविरत पणे करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व हे सामाजिक कार्य असेच नि:स्वार्थीपणे चालु रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सौ दुर्गाताई तांबे, श्रीमती कमल मोरे, ॲड सखाराम कोळसे पाटील, ॲड प्रताप परदेशी,श्री सुभाष देशमुख, माजी खासदार उत्तमसिंग पवार, श्री भानुप्रताप बर्गे, एअर वाईस मार्शल निखिल चिटणीस ( निवृत्त), अंतर राष्ट्रीय खेळाडू रेशमा पुणेकर यांनी आपपापले विचार व स्वतःच्या कार्या चा उलगडा केला.
श्री अशोक काकडे यांनी सारथी संसथेबददल सखोल माहीती देऊन देशात तच नव्हे तर परराष्ट्रात देखील सारथी च्या माध्यमातून किती विद्यार्थ्यी शिशवृती घेत आहेत याची कल्पना दिली. कार्यक्रमात मराठवाडय़ातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आयुर्वेदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणास लागणारे सर्व पुस्तके, ड्रेस, वह्या ,तसेच परभणी येथील (मानवत तालुका) शाळेतील व गावातील भूमिहीन व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी, चोळी, तर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बुट, वह्या, कपडे, पेन, पेन्सिल, इत्यादी देऊन ,आर्थिक मदत करण्यात आली.
त्याच बरोबर जालना जिल्ह्यातील ( मंठा व घनसवंगी तालुका) अनाथ, भूमिहीन व आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना, महिलांना, जीवन उपोयोगी साहित्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करण्यात आली. या बरोबर इतर काही जिल्ह्यातील विद्यार्थी व महिला यांना देखील मदत करण्यात आली.
धोर्डे पाटील ट्रस्ट चे सेवेचे हे 10 वे वर्ष असून राज्यातील इतर ठिकाणी, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अडचणीवर मदत करून प्रसंगी त्या कुटुंबांना शैक्षणिक कार्यासाठी धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत असते. 2019 मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील महापुरात, शेतीचे नुकसान झालेल्या अत्यंत गरीब कुटुंबातील मुलीना शैक्षणिक फी व इतर साहित्या साठी मदत करण्यात आली.
2020 मध्ये कोरोना च्या भिषण संकटात ट्रस्ट ने नांदेड महानगरपालिकेतील महिला सफाई कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर कपडे व साड्यांचे वाटप करून मदत केली. 2020 मध्ये कोरोना मध्येच बाहेरगावचे, mpsc चा अभ्यास करणारे जे विद्यार्थी पुणे येथे अडकून पडले होते त्या पैकी 200 ते 300 विद्यार्थ्यांना पुण्यात सलग 10 दिवस रोज एक वेळी जेवणाचा डबा देण्यात आला.
2021 मध्ये कोरोना च्या दुसर्या लाटेत ,हिंगोली जिल्ह्य़ातील पुर्णा तालुक्यातील काही गावांत देखील साहित्य वाटप करून मदत करण्यात आली. अशा प्रकारे अनेक सामाजिक कामे ट्रस्ट द्वारे दरवर्षी केली जातात.
कार्यक्रमास आमदार सत्यजीत तांबे, अप्पर जिल्हा न्यायाधीश उमेशराव मोरे, कैलास बापु वाणी, सुनील नहार, श्यामभाऊ शेंडे, के.के.गिरमे, गोपाळ राजूरकर, सागर तुपे, पराग सपकाळ, विशाल भोसले, विराज तावरे, किशोर बोरावके, विठ्ठल जाधव, माणिकराव शेळके, पुणे बार असोसिएशन चे अनेक सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.