Your Alt Text

राजेश टोपे आरोग्‍यमंत्री होते तरीही एवढ्या मोठ्या कुंभार पिंपळगांवात ग्रामीण रूग्‍णालय का नाही ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील गावांचा वापर फक्‍त मतदाना पुरताच होतोय की काय असा प्रश्‍न आता उपस्थित करण्‍यात येत आहे. कारण ज्‍या सुविधा आणि आरोग्‍य सेवा येथे मिळणे क्रमप्राप्‍त होते त्‍या सुविधा जाणीवपूर्वक नाकारण्‍यात आल्‍यात की काय असाही प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.

या भागातील कुंभार पिंपळगांव ही सर्वात जुनी PHC आहे. या प्राथमिक आरोग्‍य केंद्रात फक्‍त कुंभार पिंपळगांव सर्कलच नव्‍हे तर इतर भागातील रूग्‍ण येत असतात, प्रसुतीसाठी तर गोदाकाठच्‍या पलीकडील तालुक्‍यातील सुध्‍दा रूग्‍ण येत असतात. मात्र ज्‍या गरोदर स्‍त्रीयांची प्रसुती येथे करणे शक्‍य नाही त्‍यांना ऐनवेळी पुढे पाठवावे लागते.

सध्‍या येथे कोणत्‍याही सुविधा नसतांना दररोज सामान्‍यता 100 सामान्‍य रूग्‍ण येतात, तर बुधवारी बाजाराच्‍या दिवशी जवळपास 200 रूग्‍ण येतात. जर गावांचा विचार केला तर शेजारच्‍या तालुक्‍यातील गावांसह 40 ते 50 गावातील रूग्‍ण या प्राथमिक आरोग्‍य केंद्रात उपचार मिळेल या आशेने येतात, परंतू येथे असलेल्‍या अपुऱ्या सुविधे अभावी त्‍यांना परत जावे लागते.

मर्यादित औषधे !

येथील प्रा.आ.केंद्रात गरोदर मातांचे इंजेक्‍श्‍ान नसतात, कुत्रा चावल्‍या नंतर आवश्‍यक असणारे इंजेक्‍शन नसतात, खोकल्‍याचे कफ सिरफ नेहमीच संपलेले असतात. इतर महत्‍वाच्‍या अनेक गोळ्या औषधे येथे उपलब्‍ध नसतात. त्‍यामुळे गोरगरीब रूग्‍णांना नाईलाजाने खाजगी दवाखान्‍यात उपचार घ्‍यावे लागतात.

अपघात झाल्‍यास !

आष्‍टी ते कुंभार पिंपळगांव 18 कि.मी. आणि कुंभार पिंपळगांव ते घनसावंगी 20 कि.मी. असे जवळपास 38 ते 40 कि.मी. रस्‍त्‍यावर मध्‍ये कोठेही अपघात झाल्‍यास ग्रामीण रूगणालय नाही, किंवा कुंभार पिंपळगांव व परिसरातील 40 गावांमध्‍येही अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीवर उपचाराची सुविधा नाही.

या भागात कोणाचा अपघात झाल्‍यास त्‍यास येथील प्राथमिक आरोग्‍य केंदात आणून काहीच उपयोग नाही, कारण त्‍याला आवश्‍यक उपचार घनसावंगी शिवाय पर्याय नाही. अपघाता नंतरचे 1 तास जख्‍मी व्‍यक्‍तीसाठी अत्‍यंत महत्‍वाचे असते, जर या 1 तासाच्‍या आत उपचार मिळाल्‍यास अनेकांचा जीव वाचू शकतो.

अनेक खाजगी दवाखाने !

कुंभार पिंपळगांव शहरात अंदाजे 40 च्‍या आसपास खाजगी दवाखाने आणि जवळपास तेवढेच मेडीकल आहेत. काही दवाखान्‍यांमध्‍ये 100 ते 150 तर काही दवाखान्‍यांमध्‍ये 50 च्‍या आसपास रूग्‍ण येत असतात. यावरून आपल्‍याला अंदाज लावता येईल की कुंभार पिंपळगांव शहरात येणाऱ्या रूग्‍णांची संख्‍या किती जास्‍त आहे.

ग्रामीण रूग्‍णालय का नाही ?

घनसावंगी येथे उपजिल्‍हा रूग्‍णालय मंजूर झाले, तिर्थपुरीला उपजिल्‍हा रूग्‍णालय मंजूर झाले त्‍याचे स्‍वागतच आहे, पण कुंभार पिंपळगांवला उपजिल्‍हा रूग्‍णालय तर सोडाच त्‍यापेक्षा कमी दर्जा असलेले ग्रामीण रूग्‍णालय सुध्‍दा का मिळाले नाही ? हा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे.

कुंभार पिंपळगांवला ग्रामीण रूग्‍णालय मिळाले असते, तर येथे विविध उपचारासाठी स्‍वतंत्रपणे MD डॉक्‍टर मिळाले असते, त्‍यामध्‍ये पोटाचे डॉक्‍टर, हाडाचे डॉक्‍टर, स्त्रियांचे डॉक्‍टर व इतर आजारांसाठीही स्‍वतंत्र एमडी डॉक्‍टर मिळाले असते आणि विविध टेस्‍ट (चाचण्‍या) सुध्‍दा मोफत झाल्‍या असत्‍या, म्‍हणजेच गोरगरीब रूग्‍णांचे खाजगी दवाखान्‍यात खर्च होणारे हजारो रूपये वाचले असते.

जर आज घनसावंगी येथील ग्रामीण रूग्‍णालयात गोदाकाठच्‍या गावातील रूग्‍णांना उपचारासाठी जायचे असेल तर जवळपास 35 ते 40 कि.मी. अंतर कापून जावे लागते. मग एखादा एमरजन्‍सी पेशंट असेल आणि त्‍याला तात्‍काळ उपचाराची गरज असेल तर त्‍याचा जीव वाचेल का ? गोरगरीबांना खाजगी दवाखान्‍यातील उपचारासाठी पैसे नसतील तर रूग्‍णांचा जीव जावू द्यायचा का ? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

आरोग्‍यमंत्री असण्‍याचा फायदा काय ?

माजी मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्‍यमंत्री असतांना कोरोना मध्‍ये चांगले काम केले असेलही परंतू ज्‍या प्रमाणे तिर्थपुरीला उपजिल्‍हा रूग्‍णालय मंजूर केले तसेच जर कुंभार पिंपळगांवला उपजिल्‍हा रूग्‍णालय शक्‍य नसेल तर किमान ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करता आले नसते का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

माजी आरोग्‍यमंत्री तथा घनसावंगी मतदारसंघाचे आमदार यांनी एखाद्या सचिवाला किंवा आरोग्‍य यंत्रणेला आरोग्‍यमंत्री असतांना एक शब्‍द टाकला असता तरी ग्रामीण रूग्‍णालय झाले असते, मात्र राजेश टोपे यांनी गोरगरीब व सामान्‍य जनतेला चांगल्‍या आरोग्‍य सेवेपासून वंचित ठेवायचे होते, त्‍यामुळे त्‍यांनी ग्रामीण रूग्‍णालय कुंभार पिंपळगांवला मंजूर केले नाही.

घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे हे यापूर्वी आरोग्‍यमंत्री होते, या मतदारसंघातून ते चार – चार वेळेस आमदार, मंत्री होवून सुध्‍दा त्‍यांना मतदारसंघाचा विकास करता आला नाही, आरोग्‍यमंत्री असांना कुंभार पिंपळगांवला ग्रामीण रूग्‍णालय करणे त्‍यांच्‍यासाठी काहीच मोठी गोष्‍ट नव्‍हती, परंतू त्‍यांनी जाणीवपूर्वक केले नाही. मग कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील लोकं त्‍यांना फक्‍त मतदानापुरतीच लागतात का ? याचे उत्‍तर त्‍यांनी द्यावे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पाहू शकता…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

fjsdkljsfklsjd 1
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!