Your Alt Text

राज्‍यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी मुख्‍यमंत्री वारकरी महामंडळ स्‍थापन करण्‍याचा शासन निर्णय जारी !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
महाराष्‍ट्र राज्‍यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा पुरवविण्‍याच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्र शासनाने एक महत्‍वपूर्ण निर्णय घेतला असून वारकऱ्यांसाठी आता मुख्‍यमंत्री वारकरी महामंडळाची स्‍थापना करण्‍यात येणार आहे, विशेष म्‍हणजे महामंडळ स्‍थापन करण्‍यात बाबत शासनाने जीआर सुध्‍दा काढला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, राज्‍याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्‍ट्रातील गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात, वारीमध्‍ये मोठ्या संख्‍येने कामकरी, कष्‍टकरी, शेतकरी, माता भगीनी यांचा समावेश असतो. परंतू कालानुरूप दिंड्यांची संख्‍या वाढल्‍याने वारीच्‍या व्‍यवस्‍थापनाचे सूक्ष्‍म नियोजन करणे महत्‍वाचे होते, त्‍याकरीता वारकरी महामंडळाची स्‍थापना करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

jfkjfkslkdfsldkj

पांडूरंगाचे दर्शन करण्‍यासाठी शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांची पायी दिंडीच्‍या माध्‍यमातून वारी करण्‍याची पवित्र परंपरा महाराष्‍ट्रात आहे. वारकरी महामंडळाच्‍या माध्‍यमातून तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार, वारकऱ्यांना अन्‍न, सुरक्षा, वैद्कीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इत्‍यादी सोयी सुविधा पुरविण्‍याकरीता व कल्‍याणकारी योजना राबविण्‍या करीता मुख्‍यमंत्री वारकरी महामंडळ कार्य करणार आहे.

सोबतच वारकरी संप्रदायाच्‍या अडीअडचणी, प्रश्‍न सोडवणे, सर्व पालखी मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व किर्तन साहित्‍याकरीता अनुदान देणे, पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्‍ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्‍वर, पैठण, कोल्‍हापूर, शेगाव, तारकेश्‍वर, भगवानगड, अगस्‍तीऋषी संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्‍हा सोलापूर व इतरही तिर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार आहे. तसेच चंद्रभागा, गोदावरी, इंद्रायणी व इतर नद्या प्रदूषणमुक्‍त करण्‍यासाठी उपाययोजना सुध्‍दा महामंडळाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार आहे.

महामंडळाची रचना

मुख्‍यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्‍यालय पंढरपूर येथे असेल, महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्‍त IAS अधिकाऱ्यांची व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. सदरील महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींचे असेल. तसेच आवश्‍यकतेनुसार भविष्‍यात महामंडळाच्‍या माध्‍यमातून वारकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले जाणार असल्‍यामुळे किर्तनकार व वारकऱ्यांसाठी महामंडळ महत्‍वपूर्ण ठरणार आहे.



इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!