जमिनीसाठी 16 लाख रूपये अनुदान कोणाला मिळणार ?

शासनाने भुमिहीन लोकांना स्‍वावलंबी बनवण्‍यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना सुरू केली असून या योजनेच्‍या माध्‍यमातून पात्र लाभार्थ्‍याला कोरडवाहू जमीन असेल तर 4 एकरसाठी 20 लाख पर्यंत अनुदान दिले जाते, तसेच जमीन बागायत असेल तर दोन एकर जमिनीसाठी 16 लाख पर्यंत अनुदान दिले जाते.

सदरील योजना ही फक्‍त दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरू करण्‍यात आलेली आहे. सदरील घटकातील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून ही योजना सुरू करण्‍यात आलेली आहे.

जिल्‍हास्‍तरीय समितीकडून जमीन खरेदी केली जाते व नंतर निवड झालेल्‍या लाभार्थ्‍यासह त्‍याचे वाटप केले जाते. लाभार्थ्‍याचे वय किमान 18 व कमाल 60 इतके असावे, दारिद्य रेषेखालील कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षापेक्षा जास्‍त असल्‍यास कुटुंब प्रमुखाच्‍या पत्‍नीला लाभ देता येतो.

इतर महत्‍वपूर्ण योजना व बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!