Your Alt Text

बँकांनी पीक कर्जासाठी विनाकारण टाळाटाळ केल्‍यास कार्यवाही होणार ! येथे करा तक्रार ! | Complaint for Crop Loan

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
शेतकरी आता बँकांकडे पीक कर्जासाठी जात असल्‍याचे चित्र असून जर बँका पीक कर्जासाठी विनाकारण टाळाटाळ करत असल्‍यास त्‍यांच्‍यावर कार्यवाही होणार आहे. त्‍यामुळे नागरिकांनी बँकांकडून नाहक त्रास होत असल्‍यास त्‍याची तक्रार आवश्‍य करावी असे आवाहन करण्‍यात आले आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, पीक कर्जासाठी बँकांमध्‍ये शेतकऱ्यांच्‍या चकरा सुरू झाल्‍या आहेत, परंतू अनेकदा असे दिसून येत आहे की, बँकांकडून शेतकऱ्यांना टोलवाटोलवी केली जात आहे, अनेकदा त्‍यांना अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे.

Complaint for Crop Loan

या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकाऱ्यांनी सर्व राष्‍ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेसह व्‍यापारी बँकांनाही आदेश देवून अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करण्‍यात येवू नये असे आदेश दिले आहेत. जिल्‍हा प्रशासनाने सूचित केलेल्‍या कागदपत्रांशिवाय इतर कागदत्रांची मागणी करू नये असेही आदेशात म्‍हटले आहे.

शासनाने यापूर्वीच बँकांना आदेशित केले होते की, शेतकऱ्यांना कोणत्‍याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्‍यावी, शिवाय अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करण्‍यात येवू नये, परंतू तरीही अनेक बँक शाखा शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्‍याचे दिसून आले आहे. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाने आता संबंधित बँकांना आता स्‍पष्‍ट आदेश दिले आहेत, तसेच बँका जर कर्ज देण्‍यास टाळाटाळ करत असल्‍यास शेतकऱ्यांनी थेट तक्रार करण्‍याचे आवाहन केले आहे.

बँकेची तक्रार कुठे करायची ? येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!