Your Alt Text

जिल्‍हाधिकारी महोदय एसी कॅबीन सोडा आणि जिल्‍ह्यातील सर्व रूग्‍णालयांच्‍या दुरावस्‍थेची तात्‍काळ पाहणी करा ! – मुख्‍यमंत्र्यांचे आदेश | Chief Minister order to all Collectors

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Chief Minister order to all Collectors : राज्‍यातील सरकारी रूग्‍णालयांमध्‍ये झालेल्‍या मृत्‍यूनंतर सरकारने पाऊले उचलण्‍यास सुरूवात केली असून या मृत्‍यू प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. सदरील समिती लवकरच आपला अहवाल सादर केल्‍यानंतर दोषींवर कडक कार्यवाही करण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.

विशेष म्‍हणजे आतापर्यंत औषधे खरेदीची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती, आता त्‍यात सुधारणा करून औषधे खरेदी करण्‍याचे अधिकार थेट संबंधित जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकाऱ्यांना देण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे कमी वेळेत औषधे खरेदी करता येणार आहेत.

विभागीय आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी, रूग्‍णालयांचे अधिष्‍ठाता आणि जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक यांनी एक टीम म्‍हणून आरोग्‍य यंत्रणेचे काम करावे, आवश्‍यक निधी आणि अतिरिक्‍त साधनसामुग्रीची मागणी असल्‍यास तात्‍काळ पुरविण्‍यात यावी, मनुष्‍यबळ कमी असल्‍यास आउटसोर्सिंग करण्‍याचे अधिकारही जिल्‍हास्‍तरावर देण्‍यात आले आहेत.

Chief Minister order to all Collectors

राज्‍यातील सर्व शासकीय रूग्‍णालये, महापालिका व नगरपालिका रूग्‍णालये, प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, वैद्यकीय महाविद्याच्‍या अख्‍त्‍यारितील रूग्‍णालयांना तात्‍काळ भेट देवून पाहणी करण्‍याचे आदेश मुख्‍यंमत्री एकनाथ शिंदे यांनी राज्‍यातील सर्व जिल्‍हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आतापर्यंतचा अनुभव :-

अपवाद सोडल्‍यास शक्‍यतो जिल्‍हाधिकारी आपली AC कॅबीन सोडत नाहीत किंवा ग्राउंड लेवलला जात नाहीत, असा सामान्‍यत: नागरिकांचा अनुभव आहे. त्‍यामुळे किमान आरोग्‍य यंत्रणेचे वाजलेले तिन तेरा लक्षात घेता आणि मुख्‍यमंत्र्यांनी दिलेले आदेश लक्षात घेता संबंधित जिल्‍हाधिकारी महोदय आपली कॅबीन सोडतात का ? आणि काही चुकीचे आढळून आल्‍यास तात्‍काळ कार्यवाही करतात का ? हे पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.

फक्‍त जिल्‍हाधिकारीच नव्‍हे तर जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व इतर अधिकारी यांनीही वेळोवेळी त्‍यांच्‍या अख्‍त्‍यारीत येत असलेले रूग्‍णालय, प्रा.आ.केंद्र यांना भेट देवून तात्‍काळ तपासणी करणे, उपाययोजना करणे व चुकीचे काही घडत असल्‍यास दोषींवर कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. जिल्‍हाधिकारी यांच्‍या प्रमाणेच सदरील अधिकारी सुध्‍दा हे प्रकरण गांभीर्याने घेतात का हे पाहणे सुध्‍दा महत्‍वपूर्ण ठरणार आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!