Your Alt Text

कुंभार पिंपळगांव कॅनरा बँक शाखेत दलालांशिवाय जमेना ! काही दिल्‍याशिवाय कोणी काम करेना ! | Canara Bank kp news

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील कॅनरा बँक शाखेत दलालांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे, शाखेत दलालांशिवाय जमेना ! अन काही दिल्‍याशिवाय कोणी काम करेना ! अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.

सदरील बँक शाखेत परिसरातील अनेक गावातील शेतकरी, व्‍यापारी व नागरिक विविध कामासाठी येथे जात असतात, विशेष करून शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत वारंवार चकरा मारत असतात, परंतू येथे असलेल्‍या दलालांशिवाय फाईल पुढे सरकत नसल्‍याचे चित्र येथे पहायला मिळत आहे.

फाईल मागे ठरलेले अर्थकारण :-

प्रत्‍येक फाईलच्‍या मागे शेतकऱ्यांना या दलालांना काही ना काही द्यावे लागते, अर्थपूर्ण व्‍यवहार पूर्ण झाल्‍यानंतरच पुढील कार्य पुढे सरकते, नसता फाईल धुळखात पडून राहते किंवा त्‍या फाईलला कोणी हातच लावत नसल्‍याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

बँक परिसरात अनेक दलाल दिसून येत आहेत, कोणत्‍याही प्रकारची कर्जाची फाईल असल्‍यास हे दलाल आपले अर्थपूर्ण व्‍यवहार पूर्ण करण्‍यासाठी तयारच असतात, प्रत्‍यक्ष कोणी शेतकरी बँकेत गेल्‍यास त्‍यांना कर्जासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्‍यामुळे दलालांचे फावते.

महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तीला प्रसाद

सदरील दलालांच्‍या माध्‍यमातून कर्ज प्रकरणाशी संबंधित महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तीला प्रसाद जात असल्‍याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे, म्‍हणजेच दलाल जे काही घेतात त्‍यातून काही प्रसाद संबंधित व्‍यक्‍तीला जात असल्‍याचे शेतकरी सांगत आहेत.

दलाल तुपाशी अन शेतकरी उपाशी !

बँकेत येणारे शेतकरी आपले काम व्‍हावे म्‍हणून लाईन मध्‍ये उभे असतात, अनेकांना तर बसायला पण जागा नसते, उभे राहूनच ते आपला नंबर कधी येईल, आपले म्‍हणणे कधी ऐकून घेतले जाईल म्‍हणून ताटकळत उभे असतात, मात्र दलाल मस्‍तपैकी खुर्चीवर बसून त्‍यांचा खर्च किती लागेल म्‍हणजेच प्रसाद किती द्यावा लागेल हे सांगत असतात.

दलालांना बँकेचा आशिर्वाद !

बँकेच्‍या आशिर्वादा शिवाय दलाल वरची मलाई खावूच शकत नाही, बँकेतील कर्मचाऱ्यांचे आणि दलालांचे असलेले अर्थपूर्ण संबंध पाहता बँकेचा आशिर्वाद नाही असे म्‍हणता येणार नाही. राजरोसपणे दलाल शेतकऱ्यांची लूट करत असतांना बँक मात्र बघ्‍याची भुमिका घेत असल्‍याने अधिक काही सांगायची गरज नाही.

योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!