Your Alt Text

जांबसमर्थ – कैनरा बैंक शाखा में… ये क्‍या हो रहा है गालिब, बैंक बन गई है लैला और मजनू बन गए है दलाल ! | Canara Bank Jambsamarth Branch News

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्‍यातील जांबसमर्थ येथील कॅनरा बँक शाखेत सर्वसामान्‍य शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी विनाकारण हैराण केले जात आहे, मात्र तेच कर्ज प्रकरण जर दलालांमार्फत केल्‍यास ते प्रकरण तातडीने निकाली काढले जात असल्‍याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून फाईल बँकेत दाखल केल्‍यास त्‍यास उडवाउडवीची उत्‍तरे दिली जातात, अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी केली जाते, वारंवार चकरा मारायला लावल्‍या जातात, मात्र कोणतेही कारण देवून त्‍यास कर्ज देण्‍यास नकार दिला जातो, मात्र जर दलालांच्‍या माध्‍यमातून प्रकरण केल्‍यास त्‍यास तातडीने मार्गी लावले जात असल्‍याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे.

कधी सीबीलच्‍या नावाने बेजार केले जाते तर कधी इतर कारणाने शेतकऱ्यांना हैराण केले जाते, दलालाशिवाय शेतकरी आल्‍यास त्‍यास काही ना काही कारण देवून परत पाठवले जाते मात्र तोच शेतकरी जर दलाला मार्फत आल्‍यास त्‍याचे काम केले जात असल्‍याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकरी हैराण !

बँकेच्‍या कार्यक्षेत्रात येणारे 2 शेतकरी आधीचे कर्ज भरण्‍यास तयार आहेत, त्‍यांना आधीचे कर्ज भरून नवीन कर्ज घ्‍यायचे आहे, त्‍यांनी सर्व कागदपत्रेही गोळा केली आहेत, तसेच 7/12 वर उसाचा पेरा घेण्‍यास सांगितले ते सुध्‍दा शेतकऱ्यांनी घेतले, बँकेला लागणारे सर्व कादगपत्रेही संबंधित शेतकऱ्यांनी सादर केलीत.

परंतू सदर शेतकरी दलाला मार्फत न गेल्‍यामुळे त्‍याचे पीक कर्ज देण्‍यास टाळाटाळ केली जात आहे, पूर्वीचे कर्ज भरून न घेतल्‍यामुळे त्‍या शेतकऱ्याचे व्‍याज वाढत आहे, त्‍यामुळे शेतकरी एनपीए मध्‍ये जात आहे. जर हेच प्रकरण दलाला मार्फत केले असते तर आतापर्यंत प्रकरण आधीच झाले असते. अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांचे कर्ज भरूनही घेतले नाही आणि त्‍यांना नवीनही दिले नाही असे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे.

बँक बन गई है लैला और मजनू बन गए है दलाल !

सदरील बँक शाखेत बँक आणि दलाल यांचे एवढे प्रेमळ संबंध झाले आहेत की, बँकेचे दलालांशिवाय जमेना आणि दलालांचे बँकेशिवाय जमेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, “हम दोनो बने है एक दुजे के लिए” अशीच काही परिस्थिती येथे पहायला मिळत आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्‍या आहेत, मात्र या लैला – मजनू जोडीवर काहीच परिणाम होतांना दिसत नाही, एकमेकांच्‍या प्रेमात हे लैला मजनू एवढे बहीरे झाले आहेत की, त्‍यांना सर्वसामान्‍य शेतकऱ्यांचा आवाजच ऐकू येईनासा झाला आहे. जेव्‍हा मजनू लैलाला सांगेल तेव्‍हाच लैलाला काही ऐकू येत आहे.

शेतकरी जेव्‍हा मजनूचे खिसे गरम करतील तेव्‍हाच लैलाला काही ऐकू येत आहे, नसता लैला तर हालचालच करत नाही. म्‍हणजेच जेव्‍हा लैला-मजनूला शेतकरी खुश करतात तेव्‍हा त्‍या शेतकऱ्याचे कर्ज प्रकरणावर विचार केल्‍या जातो.

दलालांचे जवळच्‍या शाखेवरही प्रेम !

या शाखेत कार्यरत दलाल जवळच्‍या शाखेतही अशाच पध्‍दतीने शेतकऱ्यांची लूट करत असल्‍याचे दिसून येत आहे. म्‍हणजेच येथील दलालांनी जवळच्‍या शाखेतील दलालांशी संगणमत करून तेथेही आपली धंदा सुरू ठेवला आहे.

CCTV कॅमेऱ्यात दलाल कैद !

जर वरिष्‍ठांनी योग्‍य पध्‍दतीने या शाखेतील मागील 6 महिन्‍याचे सीसीटीवी फुटेज तपासल्‍यास त्‍यांना लक्षात येईल की, दलाल या शाखेत कशासाठी येतात ? काय करतात, किती वेळ थांबतात ? वारंवार का येतात ? संबंधित अधिकाऱ्याशी काय चर्चा करतात ? काही विशिष्‍ट चेहरेच वारंवार बँकेत का दिसतात ? त्‍या तारखेला दलालांनी बँकेत काय व्‍यवहार केलेत ? या सर्व प्रश्‍नांची उत्‍तरे वरिष्‍ठांना मिळतील.

शेतकऱ्यांकडून हे दलाल एका लाखाला किती पैसे घेतात ? क्रमश: (Part 2 लवकरच…)


योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!