एल्गार न्यूज :-
गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
सदरील अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून त्यांना 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज दि.29 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अवकाळीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाच्या सूचना
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महसूल व कृषि विभागाने तातडीने कालबद्ध रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रशासनाने युध्दस्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.
सदरील झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन तसेच कृषि विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपीट याबाबत माहिती दिली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्या करीता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेवून निधी वितरीत करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.
राज्यातील कोणत्या विभागात किंवा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले आहे या प्राथमिक माहिती सुध्दा यावेळी घेण्यात आली. सर्व जिल्ह्यात लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.