Your Alt Text

सावधान ! नवीन नंबरवरून तुम्‍हाला तुमच्‍या मित्राचा फोन आला तर ! | Beware fake calls by AI

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण)
तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे, तंत्रज्ञानाचा वापर योग्‍य योग्‍य हेतूने आणि योग्‍य कार्यासाठी झाला तर ते मानव जातीसाठी फार उपयोगी पडू शकते परंतू याच तंत्रज्ञानाचा जर गैरवापर झाला तर ते अनेकांचे कुटुंब उद्धवस्‍त करू शकते असेच म्‍हणावे लागेल.

ज्‍या प्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर जगातील विविध देशात वाढत आहे त्‍याच प्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर भारतातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. तंत्रज्ञानाने मानवाला अनेक उपयोगी वस्‍तू किंवा उपकरणे दिली आहेत किंवा अशक्‍य वाटणारी गोष्‍ट शक्‍य झाली आहे. त्‍याचेच एक उदाहरण म्‍हणजे आपण एकमेकांना आज जे फोनवर बोलत असतो, तो तंत्रज्ञानाचाच एक भाग आहे.

तुम्‍हाला नवीन क्रमांकावरून फोन आला तर !

आता ए.आय. (Artificial Inteligence) चा जमाना आला आहे. या माध्‍यमातून अशक्‍य वाटणारी गोष्‍ट शक्‍य होवू लागली आहे. ज्‍या प्रमाणे एखादा रोबोट एखादे काम करू शकतो, ज्‍या प्रमाणे कंपन्‍यांमधील मशीन्‍स अनेक कामे करू शकतात, त्‍याच प्रमाणे ए.आय. म्‍हणजेच ढोबळ शब्‍दात आपण त्‍याला सॉफ्टवेअर म्‍हणू शकतो.

कंप्‍यूटर किंवा मोबाईलवर एआय च्‍या माध्‍यमातून एखाद्याचा आवाज कॉपी करणे शक्‍य झाले आहे. म्‍हणजेच तुमचा आवाज फोन किंवा इतर माध्‍यमातून काही सेकंदाचा जरी कोणाला उपलब्‍ध झाला तर त्‍या माध्‍यमातून तो ए.आय. च्‍या माध्‍यमातून तुम्‍हाला कॉल करून तुमची फसवणूक करू शकतो.

फसवणूक कशी होणार ?

आता व्‍हॉईस क्‍लोनिंग हा प्रकार समोर येत आहे. याद्वारे फसवणूक करणारे लोक तुमचा आवाज काढून फसवणूक करू शकतात. उदाहरणार्थ ए.आय. च्‍या सहाय्याने तुमच्‍या मित्राच्‍या आवाज काढून ते तुम्‍हाला फोन करतात, आणि माझा मोबाईल हरवला आहे त्‍यामुळे मी दुसऱ्याच्‍या मोबाईलवरून कॉल करत आहे, मी अडचणीत आहे त्‍यामुळे मला या क्रमांकावर पैसे पाठवा असे सांगू शकतात.

बऱ्याचदा आपण कोणतीही शहानिशा न करता मित्राला मदत करण्‍याच्‍या चांगल्‍या हेतूने पैसे पाठवतो, परंतू अशा प्रकरणात पैसे मिळाल्‍यानंतर तो संबंधित व्‍यक्‍ती मोबाईल बंद करून मोकळा झालेला असतो, अर्थातच तो क्रमांक पुन्‍हा लागत नाही. म्‍हणजेच तो क्रमांक तात्‍पुरता घेतलेला असतो.

मित्राचा आवाज कसं शक्‍य आहे ?

ए.आय. च्‍या माध्‍यमातून तुमच्‍या मित्राच्‍या आवाजाची कॉपी केली जाते आणि नंतर दुसरा व्‍यक्‍ती जसे बोलेल तो आवाज तुमच्‍या मित्राच्‍या आवाजात कनव्‍हर्ट होवून तुम्‍हाला ऐकू येतो, आवाज हुबेहुब तुमच्‍या मित्रासारखाच असतो. त्‍यामुळे जर दुसऱ्या क्रमांकारून असा कधी कॉल आल्‍यास त्‍याला तात्‍काळ प्रतिसाद देवू नका. फोन ठेवल्‍यावर तुमच्‍या मित्राला त्‍याच्‍या खऱ्या क्रमांकावर फोन करून खात्री करून घ्‍या, तेव्‍हा सगळं स्‍पष्‍ट होईल.

व्हिडीओ कॉल सुध्‍दा शक्‍य !

ए.आय. च्‍या माध्‍यमातून तुमच्‍या मित्राचा फोटो किंवा व्हिडीओ वापरून काही सेकंदासाठी किंवा कमी कालावधीसाठी व्हिडीओ कॉल सुध्‍दा येवू शकतो. अशावेळी आपल्‍याला विश्‍वास बसू शकतो. सहजासहजी लक्षात येत नसले तरी निरखून पाहिल्‍यास हा व्हिडीओ बनावट असल्‍याचे लक्षात येवू शकते.

अनोळखी नंबरवर जास्‍त बोलू नका !

तुम्‍हाला अनोळखी नंबरवरून कॉल आल्‍यास त्‍याच्‍यासोबत जास्‍त वेळ बोलू नका, कारण तो तुमचा आवाज सुध्‍दा कॉपी करून तुमच्‍या मित्राला फसवण्‍याची प्‍लानिंग करू शकतो. अनोळखी व्‍यक्‍तीसोबत जास्‍त वेळ बोलणे शक्‍यतो टाळणेच योग्‍य राहील.

मित्रांचे नंबर कोठून मिळवतात !

सदरील फसवणूक करणारे लोक सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून तुमचे मित्र शोधून काढतात, त्‍यांना फ्रेंड रिक्‍वेस्‍ट पाठवून मित्रांचा शोध घेतला जातो, अनेक प्रकरणात मुलींचे प्रोफाईल तयार करून आणि चॅट / मॅसेज करून मोबाईल क्रमांक किंवा इतर माहिती संकलि केली जाते.

व्‍हॉईस मॅसेज पाठवणे टाळा !

अनेकजण सोशल मीडियावर आपला व्‍हाईस मॅसेज म्‍हणजेच आवाजात रेकॉर्ड केलेला मॅसेज पाठवत असतात, परंतू असे करणे सुध्‍दा सुरक्षित नसल्‍याचे म्‍हणावे लागेल, कारण व्‍हाट्सअॅप किंवा इतर सोशल माध्‍यमावर कोणी तुमचा आवाज कॉपी करून AI च्‍या माध्‍यमातून कोणाची फसवणूक करू शकतो. त्‍यामुळे आधीपेक्षा जास्‍त सावधान राहणे अधिक चांगले आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!