Your Alt Text

सावधान ! तुम्‍ही ऑनलाईन खरेदी करत असलेली वस्‍तू ओरिजनल आहे का ? BIS चे ई-कॉमर्स कंपन्‍यांच्‍या गोडाउनवर छापे ! लाखोंचा माल जप्‍त !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्‍यांकडून खरेदी करण्‍यात येत असलेले प्रोडक्‍ट ओरिजनल तर आहे ना ? आपण सहजपणे कोणत्‍याही प्रकारची वस्‍तू ऑनलाईन करत असतो मात्र ते प्रोडक्‍ट किंवा वस्‍तू ओरिजनल आहे किंवा डूप्‍लीकेट असा प्रश्‍न आता उपस्थित होवू लागला आहे, कारण बीआयएस या केंद्र सरकारच्‍या संस्‍थेने मातब्‍बर कंपन्‍यांच्‍या गोडाउनवर छापे टाकून लाखोंचा माल जप्‍त केला आहे. त्‍यामुळे साहजिकच ई-कॉमर्स कंपन्‍यांच्‍या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, सध्‍या देशभरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन वस्‍तू खरेदी करण्‍याचा कल वाढला आहे, अनेकजण स्‍थानिक मार्केट मध्‍ये सहजपणे उपलब्‍ध असलेली वस्‍तू सुध्‍दा ई-कॉमर्स कंपन्‍यांच्‍या वेबसाईटवरून खरेदी करत असल्‍याने या कंपन्‍या हजारो कोटींचा व्‍यवसाय करत आहेत. सदरील कंपन्‍या विविध ऑफर्स आणि डिस्‍काउंट देवून ग्राहकांना आकर्षित करत असतात. मात्र सदरील कंपन्‍या जे प्रोडक्‍ट देत आहेत ते खरंच ओरीजनल आहेत का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, कारण दोन प्रमुख कंपन्‍या अमेझॉन व फिल्‍पकार्टच्‍या गोडाउनवर BIS (Beauro of Indian Standards) म्‍हणजेच भारतीय मानक ब्‍युरो या केंद्र सरकारच्‍या अख्‍त्‍यारित असलेल्‍या संस्‍थेने छापे टाकून लाखोंचा माल जप्‍त केला आहे.

Design Dad

अमेझॉनवर गडबड !

बीआयएस या संस्‍थेने अमेझॉन या ई कॉमर्स कंपनीच्‍या गोडाउन वर छापे टाकून ३५०० पेक्षा जास्‍त उत्‍पादने जप्‍त केली आहेत. या वस्‍तू ISI चिन्‍हाशिवाय विकली जात होती, इतकेच नव्‍हे तर या उत्‍पादनांना बनावट ISI असे लेबल लावण्‍यात आले होते. सदरील जप्‍त करण्‍यात आलेल्‍या उत्‍पादनांमध्‍ये गीझर, फुड मिक्‍सर आणि दैनंदीन घरगुती उपकरणांचा समावेश आहे.

याचाच अर्थ जप्‍त करण्‍यात आलेली उत्‍पादने किंवा वस्‍तू ही बनावट आहेत, सदरील उत्‍पादने निकृष्‍ट दर्जाची असल्‍यामुळे तसेच अनेक उत्‍पादने ही इलेक्ट्रिक असल्‍यामुळे विजेचा धक्‍का बसण्‍याचाही धोका असतो. बनावट वस्‍तू विकून सदरील कंपन्‍या पैसे तर कमवत आहेच परंतू नागरिकांच्‍या जीवाशीही खेळत आहेत असे म्‍हटल्‍यास चुकीचे ठरणार नाही.

फिल्पकार्टवरही छापे !

दिल्‍ली येथील त्रिनगर मधील Flipkart ची उपकंपनी इन्‍स्‍टाकार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. वर सुध्‍दा बीआयएस कडून छापे टाकण्‍यात आले आहेत. सदरील छाप्‍या मध्‍ये ISI चिन्‍ह आणि उत्‍पादनाची तारीख नसलेली उत्‍पादने जप्‍त केली आहेत. BIS च्‍या पथकाने जवळपास सहा लाख रूपये किंमतीच्‍या ५९० स्‍पोर्ट्स पादत्राने (फुटवेअर) जप्‍त केली आहेत.

BIS चे देशभरात छापे !

बीआयएसच्‍या अधिकाऱ्यांनी याआधी सुध्‍दा म्‍हणजेच मागील महिनाभरात देशातील अनेक भागात ही कारवाई केली असून यामध्‍ये दिल्‍ली, गुडगाव, फरीदाबाद, लखनऊ, श्रीपेरंबदूर आदी ठिकाणांचा समावेश आहे. त्‍यामुळे ऑनलाईन खरेदी करण्‍यात येत असलेल्‍या वस्‍तुंबद्दल प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहेत.

खरेदी करतांना घ्‍या काळजी !

आपण जी वस्‍तू खरेदी करत आहोत ती ओरीजनल आहे किंवा नाही हे सहजासहजी लक्षात येत नाही, ब्रांडेड कंपन्‍यांशी मिळते जुळते अनेक प्रोडक्‍ट ऑनलाईन उपलब्‍ध आहेत, ज्‍यामध्‍ये बनावट प्रोडक्‍टचा समावेश आहे. आपण काही डिस्‍काउंट मिळविण्‍याच्‍या नादात बनावट प्रोडक्‍ट तर खरेदी करत नाही ना ? याची काळजी सुध्‍दा घेणे आवश्‍यक झाले आहे. एखादी वस्‍तू स्‍थानिक मार्केट मध्‍ये मिळत नसेल तर ऑनलाईन वस्‍तू घेण्‍यास हरकत नाही, परंतू ती वस्‍तू सुध्‍दा ओरिजनल असणे आवश्‍यक आहे.

स्‍थानिक बाजारपेठला प्राधान्‍य हवे !

ज्‍या वस्‍तू आपल्‍या स्‍थानिक बाजारपेठेत उपलब्‍ध आहेत, त्‍या वस्‍तू सुध्‍दा अनेकजण ऑनलाईन मागवित असल्‍याचे दिसून येते. सदरील ऑनलाईन कंपन्‍यांच्‍या माध्‍यमातून हजारो कोटी रूपये आपण विदेशी कंपन्‍यांना देत आहोत, त्‍यामुळे आपण आपल्‍याच व्‍यापारी बांधवाचे आणि पयार्याने आपल्‍याच राज्‍याचे आणि देशाचे नुकसान तर करत नाही ना ? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्‍थानिक बाजारपेठेतून खरेदी केल्‍यावर तो पैसा स्‍थानिक बाजारपेठेतच फिरत असतो, त्‍यामुळे आपल्‍याच व्‍यापारी बांधवांनाही फायदा होतो आणि यातून अनेकांना रोजगारही उपलब्‍ध होत असतो. शिवाय अडीअडचणीत आपले स्‍थानिक व्‍यापारी आपल्‍याला सहकार्य करत असतात. त्‍यामुळे शक्‍यतो स्‍थानिक बाजारपेठेला प्राधान्‍य देणे ही काळाची गरज बनली आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!