Your Alt Text

राज्यस्तरीय सवित्रीज्योती सन्मान पुरस्कार पत्रकार अविनाश घोगरे यांना जाहिर ! | Award Announced to Avinash Ghogre

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
निर्वाण फाउंडेशन नाशिक यांच्या कडून दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय सवित्रीज्योती सन्मान पत्रकार पुरस्कार २०२३ या वर्षीचा पत्रकार अविनाश घोगरे यांना जाहीर झाला असून सदरील पुरस्‍कार
दि. ३ ऑक्टोंबर रोजी देण्‍यात येणार आहे.

निर्वाण फाउंडेशन नाशिकच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्‍यक्‍तींचा सत्‍कार करण्‍यात येतो. सदरील व्‍यक्‍तींच्‍या कार्याचा विचार करून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचां सर्वांगीण विचार करून, त्यांच्या कर्तुत्‍वाचा सन्मान म्हणून, आणि त्यांच्या कार्याचे उचित मूल्यमापन व्हावे यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येतो.

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, सामाजिक प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडणाऱ्या, आपल्या लेखणी च्या माध्यामातुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या व समाजहित जोपासणाऱ्या व्यक्तीस राज्यस्तरीय सावित्रीज्योती सन्मान पुरस्कार घोषित करण्यात येतो.

ह्या वर्षीचा निर्वाण फाउंडेशनचा राज्यस्तरीय सावित्रीज्योती सन्मान पुरस्कार २०२३ पुरस्कार विजयाचे मानकरी घनसावंगी तालुक्यातील भूमिपुत्र पत्रकार अविनाश घोगरे हे ठरले आहेत. पत्रकार अविनाश घोगरे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अनेक वर्षांपासून निर्भीड, निःपक्ष पत्रकारिता करीत आहेत, आपल्या पत्रकारितेतुन त्यांनी आजवर अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या कार्याचा गुण गौरव म्हणूनच ते ह्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारा साठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील सर्व पत्रकार, घनसावंगी शहरातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर प्रमुख बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!